आता शेतकऱ्याची चेष्टा होऊ देणार नाही, वेळीच कारखानदारांनी शेतकऱ्यांची देय रक्कम द्यावी, अन्यथा पुढील आंदोलन काटा बंद पाडण्याचे असेल, असा इशारा प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष पवार यांनी दिला. मंगळवेढा तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांकडून विक्रमी गाळप केले जात आहे. मात्र कारखान्यांनी शासन नियमानुसार ठरलेली एफआरपीची रक्कम १४ दिवसांच्या आत दिली नाही. तसेच मागील हंगामातील एफआरपी देण्यास विलंब लावला आहे. ती सर्व माहिती घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम तत्काळ वर्ग करावी, असे त्यांनी सांगितले.
सध्या श्रीसंत दामाजी कारखाना, भैरवनाथ शुगर, युटोपिएन शुगर या कारखान्यांनी २५०० रुपये दर जाहीर करावा व दुष्काळी तालुक्यातील ऊस उत्पादकांना शासन नियमानुसार ठरलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉ. माणिक पवार, माजी सरपंच दादासो पवार, शिवाजी पवार, रामचंद्र पाटील, प्रा. सुभाष भुसे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी केंगार, श्रीपाद पाटील, समाधान हेंबाडे, सचिन गरंडे, आनंद गुंगे, बापूसाहेब घोडके, रोहिदास कांबळे, दादासाहेब पवार, सर्कल घाडगे, शिवाजी मासाळ, अण्णा गणपाटील, पोलीसपाटील महेश पवार, राकेश पाटील, अजित बंडगर, नितीन पवार, संजय कालीबाग, दत्ता इंगळे, रोहन इंगळे, चंद्रकांत गुरव, दत्तात्रय कोरे, सुरेश टोमके, मच्छिंद्र रोंगे, बापू जाधव, बाळू पवार, आप्पा गोरे, ओंकार काकेकर, भारत पवार, शरद पाटील, दादा सलगर, किसन गायकवाड, दादासाहेब पवार, आबा सूर्यवंशी, सुनील गणपाटील, दया येडसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय टोमके यांनी केले.