------
बियाणांचा तुटवडा
खरीप हंगामासाठी सोयाबीन, उडीद, बाजरी, तूर, मूग आदी पिके घेतली जातात. गेल्या दहा वर्षांपासून बाजरी, मूग ही पिके घेण्याचे प्रमाण घटले आहे. उडीद आणि सोयाबीनच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर वाढला आहे. बाजारात या दोन्ही बियाणांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.
---------
ऑनलाइन नोंदणीचा फटका
कृषी विभागाकडून खरिपासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवले जातात. २४ मेपर्यंत शेतकऱ्यांकडून बियाणांची ऑनलाइन नोंदणी करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या होत्या. केवळ १० टक्के शेतकऱ्यांनीच ऑनलाइन नोंदणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रणालीमुळे ९० टक्के शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-------
सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ
गेल्या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. मराठवाड्यातून आलेल्या या पिकाने जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील क्षेत्रात वाढ झाली आहे. तेलबियांची मागणी वाढली असून त्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
-----