शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली मृगाची प्रतिक्षा, खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज, बियाणे, खतांची उपलब्धता

By admin | Published: June 03, 2017 5:07 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी प्रशासनाच्या कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. खते आणि बियाणांची उपलब्धता झाली असून आता मान्सून बरसण्याची प्रतीक्षा आहे.सोलापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १४ लाख ८८ हजार हेक्टर असून लागवडलायक क्षेत्र ११ लाख ७३ हजार हेक्टर आहे. मागील खरिपाचे पेरणी क्षेत्र ९१ हजार हेक्टर होते. रब्बीचे आठ लाख ३२ हजार हेक्टर तर उन्हाळी पिकांचे क्षेत्र आठ हजार हेक्टर होते. २०१७-१८ च्या जिल्ह्यातील कृषी हंगामासाठी सरासरी मागीलप्रमाणे क्षेत्र गृहीत धरण्यात आले असून खरिपाच्या तीन लाख आठ हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी २९ हजार १७२ क्ंिवटल महाबीज आणि खासगी बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. एक लाख ४१ हजार ५०० मेट्रिक टन खत प्राप्त झाले असून मागील हंगामातील ६८ हजार ५०२ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यातून यंदाच्या हंगामातील खताची गरज पूर्ण होणार आहे.शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानातील विहिरी जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. --------------------यंदा तुरीचे क्षेत्र घटण्याची शक्यताच्मागील हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन होऊनही सरकारकडून तूर खरेदीसंदर्भात झालेली चालढकल लक्षात घेता यावर्षी जिल्ह्यातील तुरीचा पेरा घटण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात सर्वाधिक उत्पादन आणि पेरा तुरीचा होता. मात्र कमी भाव आणि खरेदी नसल्याने शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यास उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच उडीद, सोयाबीन, मुगाचा पेरा वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. ---------------------खते आणि बियाणांचे वाटप योग्यपणे व्हावे, यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर अनुक्रमे कृषी विकास अधिकारी आणि तालुका कृषी विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासोबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी निविष्ठा तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही तिन्ही पथके बियाणे आणि खतांच्या वाटपावर लक्ष ठेवणार असून प्रत्येक कृषी केंद्रांच्या तपासणीचे आदेशही समितीला देण्यात आले आहेत.