सोलापूर : सोलापूर शहराबरोबरच दक्षिण,उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ आणि अक्कलकोट शहरातील शेतकºयांना शेतावर ये-जा करण्यासाठी दुचाकी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच वरील तिन्ही शहर व जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू असणार आहे, अशी संचारबंदीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करणे व अँटिजन किटद्वारे चाचण्या वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये बार्शी, मोहोळ, अक्कलकोट या तीन शहराबरोबरच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील २७ गावांमध्ये कडक संचारबंदी लागू करण्याचे नियोजन केले आहे.
गेल्या आठवड्यात या गावातील संसर्ग पाहून पोलीस अधीक्षकांनी हा प्रस्ताव दिला होता. तहसीलदार व प्रांताधिकाºयांमार्फत संबंधित गावांचा अहवाल घेण्यात आला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशात शेतकºयांना दुचाकी वापरावर बंदी घातली होती. पण शेतातून ये-जा करणे, वैरण, दूध, पाणी यासाठी दुचाकी आवश्यक असल्याचे निदर्शनाला आणून दिल्याने ही बंदी मागे घेण्यात आली आहे. तसेच न्यायालयीन कर्मचाºयांना सवलत दिल्याचे आदेशात नमूद आहे. त्यात न्यायालयीन कामकाज सुरू राहणार अशी दुरुस्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. संचारबंदीच्या चर्चेवेळी अनेकांचा विरोधही झाला होता, पण आता कारण पटल्याने व्यापाºयांची सहमती झाल्याचे दिसून येत आहे. संचारबंदीचा कालावधी दहा दिवसांचा असला तरी त्यात सुटीचे दिवस व सम-विषम तारखेचा विचार केला तर पाच दिवस दुकाने बंद राहणार आहेत. गेल्या आठवड्यात आढळलेल्या रुग्णसंख्येवरून ३७ गावांसाठी संचारबंदीचा आदेश लागू केला आहे़
यासाठी पास केला बंधनकारकसोलापूर शहरातून भोवतालच्या गावात संसर्ग वाढत असल्याने बाधित गावात कडक संचारबंदी लागू केली आहे. शहराकडे दूध विक्रीसाठी येणाºयांना संबंधित पोलीस ठाण्यांकडून पास घेणे बंधनकारक केले आहे. यापूर्वीच्या संचारबंदीत दूधवाल्यांना सवलत दिल्यावर काहीजण नुसतेच कॅन्ड अडकावून शहरात येत होते असे दिसून आल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले. या काळात दूध दरवाढ होणार नाही याकडे प्रशासनाचे लक्ष असणार आहे.
वाढू शकतात गावं...गेल्या आठवड्यात आढळलेल्या रुग्णसंख्येवरून शहराभोवतीच्या ३७ गावांसाठी संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. पण गेल्या चार-पाच दिवसात वाढलेले रुग्ण विचारात घेता, मंद्रुप, भंडारकवठे, हत्तूर, कंदलगाव अशा गावांबाबात माहिती घेऊन दोन दिवसात सुधारित आदेश निघू शकतो अशी शक्यता जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केली.
संचारबंदीत प्रशासन हे करणारसंचारबंदीचा अंमल सुरू झाल्यावर अंमलबजावणीसाठी पोलीस रस्त्यावर असतील. संचारबंदी ज्या कारणासाठी लागू केली त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज राहणार आहे. महापालिका हद्दीत २५ हजार तर जिल्ह्यात ६ हजार अँटिजन रॅपिड किटद्वारे संशयित रुग्णांची तपासणी करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महापालिकेकडे सध्या ५ हजार किट आल्या आहेत, दोन दिवसात २0 हजार किट येतील. ग्रामीणमध्ये अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, वैराग व संसर्ग जादा असलेल्या गावात या किटचा वापर करण्यात येणार आहे.