सोलापूर: कुर्डू (ता. माढा) सह अंबड, ढवळस, चोभेपिंपरी, कुर्डूवाडी, भोसरे, पिंपळखुंटे, वडाचीवाडी, रणदिवेवाडी, वेताळवाडी, माढा, वडशिंगे, महातपूर या १३ गावांच्या विकासासाठी उजनी धरणातून बेंद ओढ्याला सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी संबंधित गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पाणी संघर्ष समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला शुक्रवारी तिसरा दिवस पूर्ण झाले. मंत्री तानाजी सावंत, आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील नागपूर विधान भवनाच्या दालनात शिष्टमंडळाला भेटून चर्चा केली. मात्र, याबाबत मात्र कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात, कुर्डू हे गाव तालुक्यात सर्वांत मोठे असून, बहुतांश लोकांचा शेती व दुग्ध व्यवसाय आहे. बेंद ओढ्यास पाणी सोडल्यास ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या उपोषणात आण्णासाहेब ढाणे, समाधान जगताप, रामा गाडे, वसंत जगताप, प्रकाश उपासे, संतोष जगताप, संदीप पाटील, भारत कापरे, हनुमंत जगताप, विशाल माळी, उमेश पाटील, संतोष कापरे, दगडू उपासे, माउली उपासे, ज्ञानदेव चोपडे, अधिकराव चोपडे, विजय भगत, सुधीर लोंढे, ऋषिकेश मुंगसे, श्रीकांत गायकवाड, भाऊराव चोपडे, गणेश जगताप, बिट्टू कुनाळे, शिवाजी कुनाळे, विजय वाघमारे, सुजित भगत, रघुनाथ रेडे, गुरुलिंग भाजीभाकरे, राजकुमार कुनाळे, माउली ताकतोडे, कुबेर बोराटे, तानाजी हांडे, रामभाऊ भानवसे, श्रीकांत जगताप हे सहभागी आहेत.