समाधान रानबा भोसले (वय ३५ वर्ष) व विराज उर्फ दादुल्या समाधान भोसले (वय ०४ वर्ष) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या पिता-पुत्राची नावे असून शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
पोलीस सूत्राकडील माहिती समाधान भोसले हे वडील रानबा भोसले व मुलगा विराज शेतात फेरफटका मारण्यासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजता ा होते. शेतात गेल्यानंतर त्यांचे वडील रानबा भोसले हे शेतातील उसावर पडलेल्या लोकरी मावा या रोगावर पावडर धुराळणी करीत होते, त्यांना मुलगा व नातू दिसले नाहीत. यामुळे त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता तेथे मुलाच्या चप्पल दिसून आल्या.
मुलगा नातू दिसून आला नाही. तसेच विहिरीच्या पायऱ्यांवरून घसरले असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी मुलगा नातू विहिरीत पडला असावा असा अंदाज करून आरडाओरड केली. विहिरीत शोध मोहीम सुरू केली ते सापडले नाहीत. शेवटी परिते येथील गणेश मुसळे या ३३ वर्षांच्या तरुणाने दोघांचे मृतदेह पाण्यात शोधून बाहेर काढले.
यावेळी सरपंच हनुमंत भोसले ,संतोष कांबळे,रामचंद्र भोसले,श्रीमंत भोसले यांनी त्यांना बाहेर काढले. फौजदार पी. व्ही. काशीद,पोहेकॉ बी एस हजारे,पोको माने-देशमुख, कॉन्स्टेबल कुलकर्णी, पोलीस नायक पठाण, पोना शेख असपाक यांनी घटनास्थळी धाव घेतली.
---
नवसाने झाला होता नातू
रानबा भोसले याना एकच मुलगा होता तर मुलास तीन मुलीनंतर मुलगा झाला होता. त्यांना अवघी पाऊण एकर जमीन होती. एकुलता एक मुलगा व नातू गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांचे मृतदेह वर काढताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
----
फोटो : १३ समाधान भोसले
१३ विराज भोसलेफोटो : १३ समाधान भोसले
१३ विराज भोसले