इटकी येथील अशोक चव्हाण व चुलते पोपट संदीपान चव्हाण यांच्यात सामाईक विहिरीचा वाद आहे. मंगळवारी सकाळी ६.३० च्या सुमारास अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सामाईक विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चालू करून डाळिंब बागेला पाणी सोडले होते. त्यावेळी चुलती मीताबाई, चुलतभाऊ मच्छिंद्र पोपट चव्हाण यांनी विहिरीवर जाऊन सदर मोटर बंद केली. यावेळी अशोक चव्हाण यांचे वडील भीमराव चव्हाण यांनी मोटार का बंद केली, असे विचारले असता तुम्ही सामाईक विहिरीवरील पाणी का घेतले असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी चुलते पोपट चव्हाण, चुलतभाऊ गोरख चव्हाण हे तेथे आले व वडील भीमराव चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करू लागले म्हणून मुलगा अशोक चव्हाण सोडविण्यासाठी मध्ये गेला. यावेळी त्यास मच्छिंद्र चव्हाण यांनी दगडाने डोक्यात, हातावर, पायावर मारहाण करून जखमी केले. तर मिताबाई चव्हाण व गोरख चव्हाण यांनी वडील भीमराव चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत अशोक चव्हाण यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
इटकीत भावकीतील चौघांच्या मारहाणीत पिता-पुत्रास जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:26 AM