भोपसेवाडी येथील प्रवीण संपत्ती नरळे हा मंगळवारी आई-वडील, पत्नी, भावजय घरासमोर थांबले होते. त्यावेळी भावजय मनीषा हिचा भाऊ बबलू हनुमंत खिलारे, वडील हनुमंत खिलारे, त्याचा अनोळखी मित्र हे (क्र. एमएच १४ बीएफ ३१४७) दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी आई मंगल व वडील संपत्ती नरळे यांना तुम्ही माझ्या बहिणीच्या मयत नवऱ्याच्या पीएफ कागदपत्रांवर सह्या करा, असे का म्हणाला म्हणून आई-वडील व त्यांच्यात शिवीगाळ होऊन एकमेकांच्या गच्ची धराधरी चालू होती. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून मुलगा प्रवीण व पत्नी रूपाली हे तेथे गेले. यावेळी बबलू खिलारे याने प्रवीणच्या डोक्यात खुर्ची मारून जखमी केले, तर हणमंत खिलारे, अनोळखी मित्र व मनीषा यांनी आई-वडिलांना ढकलून देऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ दमदाटी केली. मनीषा नरळे हिने पत्नी रूपालीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत प्रवीण संपत्ती नरळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
----