यात बबनराव ज्ञानदेव साळुंखे (वय ८०, रा. सातोली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मालकीचा ऊस गट नं. १०३/२ व १०३/३ मध्ये खोडवा आहे. हा ऊस मी व माझा छोटा मुलगा हरिश्चंद्र असा दोघांनी जोपासला आहे. असे असताना ३० जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता माझा मोठा मुलगा भालचंद्र साळुंखे हा आला. त्याने माझ्या संमतीवाचून जबरदस्तीने मजुरामार्फत २२ टन ऊस तोडून नेला. हा ऊस का तोडतो असे विचारले असता, सुरूचा ऊस मीच नेला मग हापण ऊस मीच नेणार असे म्हणून ४४ हजार रुपये किमतीच्या उसाची त्याने चोरी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
----