सोलापूर : राष्ट्रीय भूमी-अभिलेख कार्यक्रमांतर्गत संगणकीकृत सातबारा उताºयावर डिजिटल सही करण्याचे काम सुरु आहे. या कामाच्या अतिरिक्त बोजामुळे राज्य शासनाच्या ‘महाभूलेख’ वेबसाईटचा सर्व्हर क्रॅश झाला आहे. गेले १० दिवस या बेवसाईटवरुन ७/१२, फेरफार उतारे मिळणे बंद झाले आहे. ह्यडिजिटल इंडिया-डिजिटल महाराष्ट्रह्णचा डांगोरा पिटणाºया शासनाचा यामुळे फज्जा उडाला आहे.
राष्ट्रीय भूमी-अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील काही जिल्ह्यात १ मे पासून डिजिटल सहीचे सातबारा उतारे देण्यात येत आहेत. १ आॅगस्टपासून सर्वच गावांमध्ये डिजिटल सहीचा सातबारा, फेरफार उतारे मिळतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
राज्यातील सर्व ७/१२, फेरफार उतारे संगणकीकृत झाल्याचा दावाही शासनाने केला आहे. सध्या तलाठ्यांना या संगणकीकृत उताºयांवर डिजिटल सही अपलोड करण्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नियमितपणे या कामांचा आढावा घेतला जात आहे. दररोज किती काम झाले याची माहिती शासनाला कळविली जात आहे.
डिजिटल सहीसाठी तलाठ्यांना महाभूलेख वेबसाईटवर लॉगीन उपलब्ध आहे. राज्यातील सर्वच तलाठी या कामात गुंतले आहेत. एकाचवेळी सुरू असलेल्या या कामामुळे बेवसाईटचा सर्व्हर क्रॅश झाला आहे. वेबसाईट उपलब्ध आहे, पण सर्व्हर क्रॅशमुळे वेबसाईटवरील सातबारा, फेरफार उतारे दिसणे बंद झाले आहे. शासकीय कामे, कायदेशीर कामे, खरेदी-विक्री, कर्ज मागणीसह इतर कामांसाठीही शेतकºयांना ७/१२, फेरफार व गाव नुमना ८ अ उताºयांंची गरज असते. सर्व्हर बंदच्या अडचणींमुळे या कामांवरही परिणाम झाला आहे.
‘आधार’च्या सर्व्हरबद्दलही तक्रारी४शाळा, महाविद्यालये सुरु होणार असल्याने नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी महाईसेवा केंद्रावर गर्दी आहे. गेला महिनाभर युआयडीचे सर्व्हर अधूनमधून काम करीत नसल्याच्या तक्रारी केंद्रचालक करीत आहेत. घरबसल्या आधार कार्डची प्रिंट मिळेल, असे शासन सांगते. परंतु, सर्व्हर बंद पडल्यास या कामासाठीही केंद्र चालकांच्या पायºया झिजव्याव्या लागत आहेत.
डिजिटल सहीच्या कामांमुळे महाभूलेखच्या सर्व्हरवर ताण आला. रस्त्यावर एकाचवेळी अनेक वाहने आली की वाहतुकीची कोंडी होते. तसेच काहीसे महाभूलेखच्या वेबसाईटबाबतीत झाले आहे. वरिष्ठ कार्यालयाला याबाबत कळविण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातही ही अडचण असल्याचे समजते. - मोहन बशिराबादकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी.