अनेक वर्ष रब्बी हंगामाचा अभ्यास करता यावर्षी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान, थंड हवा, उष्णता असा हवामानातील बदल अचानकपणे जाणवत आहे. यामुळे सर्वच पिकांसाठी धोका होऊ शकतो. यामुळे तांबेरा, करपा, बोरी या प्रमुख रोगांना पोषकता निर्माण होत आहे. याचा दूरगामी परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर दिसणार आहे. तर फळबागेत द्राक्ष, डाळिंब, केळी याही पिकांना या बदलत्या हवामानाचा फटका बसणार आहे, एकूणच रब्बी हंगामावर हवामानाची तलवार कायम टांगती दिसत आहे.
रब्बी हंगामातील पिके
ज्वारी ३ हजार २०१ हेक्टर, मका ३ हजार २९८ हेक्टर, गहू १ हजार ३७५ हेक्टर, इतर तृणधान्य २० हेक्टर, हरभरा ३७६ हेक्टर, कडधान्य ३ हेक्टर असे एकूण ८ हजार २७३ हेक्टरवर रब्बी हंगामातील कडधान्य व तृणधान्याची लागवड झालेली आहे.
कोट ::::::::::::::::::::::
कृषी क्षेत्राला अलीकडील काळात वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. सध्या बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आवश्यक त्या फवारण्या वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. याशिवाय हवामान बदला संदर्भातील काही गोष्टींबाबत कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा.
- गजानन ननावरे
तालुका कृषी अधिकारी, माळशिरस
फोटो ::::::::::::::::::
रब्बी हंगामातील गहू पिकांवर बुरशीनाशक औषधांची फवारणी करताना भांबुर्डी येथील शेतकरी.