याबाबत कविता नवनाथ कुटे (रा. दिघंची, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी प्रशांत राक्षे (रा. पंढरपूर), नागेश शिवाजी घोडके व दत्ता घोडके (रा. बोहाळी, ता. पंढरपूर), नितीन कुरुळे (उघडेवाडी, ता. माळशिरस) यांच्यासह अज्ञात ३० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कूळ शेतीच्या वादातून सोमवारी दुपारच्या सुमारास प्रशांत राक्षे, नागेश घोडके, दत्ता घोडके, विजय राक्षे, नितीन कुरुळे यांच्यासह ३० लोक टेम्पो, दुचाकीवरून सदर ठिकाणी दहशत निर्माण करीत त्यांनी कविता कुटे, कल्पना कुटे, संगीता कुटे, उषाताई कुटे, रंजना काळेल या महिलांना बंदूक, तलवार, काठ्या-दंडुक्यांचा धाक दाखवून शिवीगाळ करीत धमकी दिली. या जमावातील लोकांपैकी एकाने राहुल भानुदास काळे यास मारहाण करीत या शेतात पुन्हा येऊ नये म्हणून सर्वांना धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राजुलकर करीत आहेत.
................
खोटी महिला उभी करुन दस्त, प्रकरण न्यायप्रविष्ट
पार्वती शंकर पाटोळे यांच्या नावे असलेल्या कटफळ (ता. सांगोला) येथील गट नंबर ३७१ मधील शेतजमिनीत दिघंची (ता. आटपाडी) येथील कल्लाप्पा कुटे परिवाराचा कब्जा व वहिवाट आहे. पार्वती पाटोळे यांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात कोणी वारस नसल्याने सदरची जमीन कूळ हक्काने आपल्या नावे करून मिळण्यासाठी कुटे यांनी सांगोला तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला आहे. तथापि पार्वती पाटोळे या नावाची खोटी महिला उभी करून सदर जमिनीचा दस्त काही महिन्यांपूर्वी करून ही जमीन ताब्यात घेण्यासाठी कुटे विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी मंगळवेढा यांच्याकडे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
फोटो ओळ ::::::::::::::
कटफळ येथील कूळ असलेल्या जमिनीत घुसून ३० ते ३५ लोकांनी शेतातील आंबा बागेसह ड्रॅगन फ्रुटची रोपे व सिमेंट पोल उखडून नासधूस केल्याचे छायाचित्र.