सरपंचपदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सदस्यांची फोडाफोडी टाळण्यासाठी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडून आपापल्या सदस्यांना सहलीवर पाठविले, तर कोणी सुरक्षितस्थळी हलविले आहेत. दरम्यान, सरपंचनिवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. सरपंच, उपसरपंचनिवडीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायतनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांना धक्का बसला, तर अनेक ठिकाणी सत्तांतरही घडले.
तारीखनिहाय गावची सरपंचपद निवड..
९ फेब्रुवारी रोजी आलेगाव, बामणी, देवळे, गायगव्हाण, महिम, नाझरा, संगेवाडी, तरंगेवाडी, अचकदाणी, भोपसेवाडी, डोंगरगाव, कमलापूर, मांजरी, वझरे, अजनाळे, हणमंतगाव, खिलारवाडी, जुजारपूर, मानेगाव, वाणीचिंचाळे, अकोला, हातीद, जवळा, महुद, राजुरी, उदनवाडी, वाकीशिवणे, घेरडी, कडलास, किडेबिसरी, कोळा, लक्ष्मीनगर, लोटेवाडी, नराळे, यलमार मंगेवाडी, हटकर मंगेवाडी, पाचेगाव बुद्रुक, कटफळ तर ११ रोजी आगलावेवाडी, चोपडी, एखतपूर, हलदहिवडी, मेडशिंगी, निजामपूर, सोमेवाडी, वासुद, बुरंगेवाडी, डिकसळ, धायटी, जुनोनी, शिरभावी, वाटंबरे, बुद्धेहाळ, हंगिरगे, इटकी, लोणविरे, मेथवडे, वाकी घेरडी, गौडवाडी येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडी होणार आहेत.