भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे.
सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा असून, बोगद्याच्या तोंडाजवळ पाणी शिल्लक नसेल, उपयुक्त पाणीसाठा ४९१ दशलक्ष घनमीटरवर येईल त्या वेळेस बोगद्याचे पाणी बंद होईल. सध्या ९० क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी, २८० क्युसेक सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी, ३२०० क्युसेक इतका विसर्ग कालव्यातून सुरू आहे. येणाºया काळात नदीला पाणी सोडावे लागणार आहे. म्हणजेच पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार आहे. एकंदरीतच निवडणुकीचे वातावरण तापले असताना पाण्याच्या मागणीसाठी शेतकºयांना झगडावे लागणार आहे.
गेल्या वर्षी १२ मार्चला उजनी धरणात पाणीसाठा ७१.८१ टक्के एवढा होता. आजच्या दिवशी यावर्षी उजनी पाणीसाठा ३.८३ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा २.५५ टीएमसी इतका आहे. चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली परंतु पुणे जिल्ह्यातील पडलेल्या पावसामुळे उजनीवरील धरणे भरली आणि तिथून विसर्ग उजनीत सोडला गेला. त्याचा फायदा उजनी धरणाला झाला. सुरुवातीला पाणी नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे उजनी धरण झपाट्याने रिकामे झाले आहे. रोज एक टक्का पाणीसाठा उजनी धरणातील कमी होत असून, येत्या दोन दिवसात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल.
उजनीची सद्यस्थिती
- - एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर
- - एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी
- - उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी
- - टक्केवारी ३.८३ %
- - एकूण टीएमसी ६५.७१
- - उपयुक्त टीएमसी २.०५
विसर्ग
- - कालवा ३२०० क्युसेक
- - बोगदा ६९० क्युसेक
- - सीना-माढा उपसा सिंचन २८० क्युसेक
- - दहिगाव उपसा सिंचन ९० क्युसेक