यावेळी उजनी धरणाचा विकास व यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना वर्षभर मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल या विषयासह अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
उजनी धरण परिसर शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष राम जगदाळे, सचिव डॉ. कैलास गोरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
१९७१ साली निर्माण झालेल्या या धरणामध्ये सध्या ११७ टीएमसी पाणी साठा साठत आहे; परंतु पन्नास वर्षांत या धरणामधील गाळ न काढल्यामुळे २५ टक्क्यांहून अधिक गाळ साठलेला आहे. यामुळे धरणातील प्रत्यक्ष पाणी साठा मर्यादेपेक्षा खूपच कमी आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागताे आहे. उजनीमधून हाेणारे पाणी वाटप याेग्य प्रमाणात हाेत नाही.
यावेळी संस्थेचे सदस्य इंदापूर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अशोक चोरमले, जिल्हा परिषद संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत शिंदे प्रदीप जगदाळे, धुळाभाऊ कोकरे, डॉ. राहुल पाटील, सरपंच विलास पाटील, देवेंद्र खडसे, अशिष गाेयल, महेश इंगळे, विनायक पाटील, नितीन नकाते, मनाेज शहा, रवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित हाेते.
कोट्यवधीची वाळू उपलब्ध
उजनी धरण क्षेत्रामध्ये पर्यटन क्षेत्राचा विकासासाठीही चर्चा करण्यात आली. याआधी झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उजनी धरणामध्ये ५० हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त किमतीची वाळू उपलब्ध होऊ शकते. यामुळे शासनाला मोठा महसूल मिळू शकताे. याप्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.
२७भीमानगर-उजनी मीटिंग
उजनी धरण परिसर शेतकरी बचाव समितीच्या स्थापनेप्रसंगी राम जगदाळे डाॅ. कैलास गाेरे, भारत शिंदे, प्रदीप जगदाळे, धुळाभाऊ काेकरे, संजू वाडे, अशाेक चाेरमले, विलास पाटील आदी.