टेंभुर्णी : माढा तालुक्यातील शिराळा (टें) येथे जमिनीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारीचा प्रकार आणि जातीवाचक शिवीगाळीचा प्रकार घडला.
जमीन मालक अजित शहाजी बनसोडे (रा. शिराळ, टें.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५फेब्रुवारी रोजी गोरख खटके, किशोर पाटील (रा. शिराळ), प्रिन्स सदाफुले व मयूर सदाफुले (रा. जामखेड) हे २० साथीदारांना घेऊन आले. सोबत चारचाकी, जेसीबी, तीन ट्रॅक्टर घेऊन आले. बनसोडे यांची जमीन ते नांगरत होते. तेव्हा बनसोडे कुटुंबीयांनी त्यास विरोध केला. यावेळी गोरख खटके यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून ही जमीन उषा सदाफुले यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.
दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार गोरख खटके,प्रिन्स सदाफुले,मयूर सदाफुले हे जवळपास २० लोकांना सोबत घेऊन आले, अजित बनसोडे, ज्ञानदेव बनसोडे. अमोल बनसोडे, आशा बनसोडे, लक्ष्मी बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, रोहिदास बनसोडे, त्रिवेणी बनसोडे, उषा बनसोडे, जालिंदर बनसोडे या सर्वांना लाकडी दांडक्याने व लोखंडी सळईने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच बंदुकीच्या गोळ्या घालू असे धमकावले. या भांडणात अजित बनसोडे, अरविंद बनसोडे, जालिंदर बनसोडे, रोहिदास बनसोडे, प्रवीण बनसोडे, तुकाराम बनसोडे, मनीषा बनसोडे, रुपाली बनसोडे
(रा. शिराळ) या सर्वांनी मिळून शिवदास महादेव खटके (रा.तांबवे) यांना लोखंडी सळई व काठ्यांनी मारहाण करून शिवदास कटके यांच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांची सोनसाखळी व खिशातील ९ हजार ५०० रुपये काढून घेतल्याची फिर्याद खटके यांनी दिली आहे. अधिक तपास बार्शी उपविभागाचे पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर हे करीत आहेत.