पंढरपूर : पंढरपूर महिला तहसीलदार यांची बदनामी होईल असा मजकूर फेसबुक या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १९८७ हा १३ मार्च २०२० रोजी पासून लागू करण्यात आला आहे. १५ जुलै २०२० रोजी दहा वाजता फेसबुक वर सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण यानी कसलाही अधिकार नसताना कसलीही खातर जमा न करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. अशा प्रकारचा मजकूर फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे, अशी तक्रार तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याच्याविरुद्ध भादवि का कलम ५०५(१), १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गाडेकर करत आहेत.------------------अब्रूनुकसानीचा करणार दावा दाखल महिला तहसीलदार विषयी चुकीचा गैरसमज पसरविणाºयाविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी सांगितली.