सोलापूर : डॉक्टराने लिहुन दिलेल्या कंपनी ऐवजी मेडीकल चालकाने दिलेल्या दुसºया औषधामुळे रूग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार नुकताच सोलापुरात घडला. या प्रकरणी गोविंद मेडिकलचे मालक व कामगार या दोघांविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सुहासीनी उल्हास हेजीब (वय-४५ रा. जिल्हा न्यायाधिश निवास क्र.-१ श्रद्धा निवास, गुरूनानक स्टेडियम, बांधकाम भवन शेजारी) या डॉ. सचिन कुलकर्णी यांच्याकडे तपासण्यासाठी गेल्या होत्या. तपासणी नंतर डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी दिली. हि चिठ्ठी घेऊन सुहासीनी हेजीब या सात रस्ता येथील गोविंद मेडिकल येथे गेल्या, तेथील कामगाराने डॉक्टरांनी दिलेल्या कंपनीचे औषध नाही, पण ते घटकद्रव्य असलेले दुसºया कंपनीचे औषध आहे. हे औषध चालेल का असे विचारून सुहासीनी हेजीब यांना दिले.
त्यांनी चिठ्ठीवरील वेळेप्रमाणे औषध घेतले मात्र ११ सप्टेंबर रोजी सुहासीनी हेजीब यांच्या चेहºयास सुज येवु लागली, अंगास खाज सुटु लागली. शरीराला त्रास सुरू झाल्याने त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी औषधाच्या चिठ्ठीतील तिसºया क्रमांकाचे औषध हे चुकीचे दिल्याने, तुम्हाला सुज येत आहे असे सांगुन तिसरे औषध दिले. अंगावर आलेली सुज कधी कमी होईल आणि किती खर्च होईल सांगता येत नाही. अधिकृत औषध हाताळण्याचे वा विकण्याचा परवाना नसणाºया कामगारास नेमण्यात आले म्हणुन मेडिकलचे मालक व कामगाराविरूद्ध भांदवि ४२0, २६९, २७६, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास फौजदार राठोड करीत आहेत.