शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महापालिकेतील रिक्त पदे भरुन घ्या, अन्यथा काही खरं नाही : अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 2:14 PM

सोलापूर : संपूर्ण शहराची माहिती असलेले आठ ते दहा अधिकारी महापालिकेत राहिले आहेत. त्यांच्यापैकी काहीजण निवृत्त होत आहेत तर ...

ठळक मुद्दे महापालिका प्रशासनाच्या वतीने सभागृहात डॉ. अविनाश ढाकणे यांचा निरोप समारंभ वेळेवर आकृतिबंध मंजूर करुन घ्या आणि रिक्त पदे भरुन घ्या - डॉ. अविनाश ढाकणेसंपूर्ण शहराची माहिती असलेले आठ ते दहा अधिकारी महापालिकेत राहिले - डॉ. अविनाश ढाकणे

सोलापूर : संपूर्ण शहराची माहिती असलेले आठ ते दहा अधिकारी महापालिकेत राहिले आहेत. त्यांच्यापैकी काहीजण निवृत्त होत आहेत तर काहीजण स्वेच्छानिवृत्तीच्या तयारीत आहेत. वेळेवर आकृतिबंध मंजूर करुन घ्या आणि रिक्त पदे भरुन घ्या, अन्यथा काही खरं नाही, असा इशारा माजी मनपा आयुक्त तथा जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांना दिला. 

 महापालिका प्रशासनाच्या वतीने सभागृहात डॉ. ढाकणे यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी, पोलीस उपायुक्त शशिकांत महानवर, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, नगर अभियंता संदीप कारंजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी केले.

डॉ. ढाकणे म्हणाले, लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, पण त्या रास्त आहेत. मी आमच्या अधिकाºयांना नेहमी सांगायचो की आपण कमी पडतो म्हणून लोक नगरसेवकांकडे जातात. नगरसेवकांनी खरं तर धोरणं ठरवायची असतात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन होते. पण यंदा हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने हे नियोजन कोलमडले. पाणीपुरवठा विभागात काम करायला अधिकारी तयार नाहीत. महापालिकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. पण पैसे कुठूनही येतील, गरज आहे आकृतिबंध पूर्ण करण्याची. पूर्ण शहराची माहिती असलेले अधिकारी नसतील तर नव्याने येणाºया माणसांना सर्व गोष्टी समजून घेण्यास वेळ लागेल. रिक्त पदे भरुन घ्या. 

रात्रीच उठून बसायचो...- आपण ठरविलेले काम पूर्ण होत नसेल तर मला त्रास व्हायचा. मंगळवारी अधिकाºयांच्या बैठकीनंतर माझा रक्तदाब वाढलेला असायचा. असे अनेकदा झाले की मला रात्र-रात्रभर झोप येत नसे. रात्रीच उठून कॉम्प्युटरसमोर बसून प्रलंबित कामांना गती देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायचो. संभाजी तलाव आणि सिध्देश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम माझ्या काळात झाले असते तर आनंद झाला असता. सिध्देश्वर तलाव सुशोभीत होईल तेव्हा काळजी घ्या. त्यात कचरा टाकून पावित्र्य घालवू नका, असेही ढाकणे यांनी सांगितले. 

शहरातील शाळा, आरोग्य केंद्रे, बागा यात आमूलाग्र बदल झाला. स्मार्ट सिटी ही एका विशेष भागापुरती योजना असली तरी डॉ. ढाकणे यांनी भुयारी गटार, एलईडीसारख्या कामातून सर्व शहराला त्याचा लाभ मिळवून दिला. - गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना

माझ्यात आणि डॉ. ढाकणे यांच्यात अनेकदा चांगली चर्चा झाली. परवा वादही झाले. लोकप्रतिनिधीने लोकभावना समजून घेऊन काम करायला हवे तर अधिकाºयांनी प्रशासनाच्या बाजूने काम करायचे असते. आमच्यात अनेकदा फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार या विषयावर चर्चाही झाली. ती आम्ही कधीही विसरणार नाही. - आनंद चंदनशिवे, गटनेते, बसपा. 

डॉ. ढाकणे यांनी कामगारांकडून काम करुन घेतले, त्याला तोड नाही. आम्ही ४० वर्षांपासून मनपा आर्थिक संकटात असल्याचे ऐकतोय. पण डॉ. ढाकणे यांनी कामगारांची पेन्शन, रजेचे प्रकरण, ग्रॅज्युएटीचे प्रश्न मार्गी लावले. - अशोक जानराव, कामगार नेते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका