सोलापूर : पर्यावरणाचे महत्त्व आता सर्वांना पटत आहे. यामुळे वृक्षारोपण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना, व्यक्ती, शासनाच्या वतीने पुढाकार घेत आहेत़ याचबरोबर विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. याच उपक्रमामध्ये आता शहर पोलीसही सहभागी झाले आहेत. अशोक चौक येथील आयुक्तालयाच्या शहर पोलीस पेट्रोल पंपावर सीडबॉलचे वाटप करण्यात येणार आहे.
शासकीय पातळीवर जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे लावण्यात येत असत़ यामुळे वृक्षांची संख्या वाढत आहे़ यामुळेच पोलीस आयुक्तालयाच्या अशोक चौक पोलीस पेट्रोल पंपावर आता पेट्रोल भरणाºया प्रत्येक ग्राहकाला सीडबॉलचे बॉक्स देण्यात येणार आहे़ यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचे सीडबॉल आहेत़ यात बांबू, गुलमोहोर, आवळा, सुबाभूळ, सीताफळ, चिंच अशा वृक्षांचे सीडबॉल आहेत़ याचबरोबर हे झाड लावल्यावर त्यासोबत सेल्फी पाठवणाºयाला शंभर रुपयांचे पेट्रोलही मोफत देण्यात येणार आहे़ जनतेमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी, झाडांचे महत्त्व कळावे, यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे.
हे उपक्रम हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वतीने हाती घेण्यात आले आहेत. ‘पेड लगाओ पर्यावरण बचाओद’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ १ आॅगस्टपासून शहर पोलीस पेट्रोल पंपावर जवळपास नऊ हजार सीडबॉलचे वाटप करण्यात येत आहे़ यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत नागरिकांमध्ये व्यवस्थापक अविनाश घोडके, पोलीस हवालदार वसमाने, चन्नप्पा स्वामी, सचिन अंबलगी हे जागरुकता निर्माण करीत आहेत.
ग्राहकाला देणार बॉक्स- आमच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाºया प्रत्येक ग्राहकाला सीडबॉलचा एक बॉक्स देणार आहोत. या बॉक्समधील झाडे लावून त्या झाडासोबत सेल्फी घेऊन पाठवले तर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वतीने लकी ड्रॉद्वारे शंभर रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे़ ‘पेड लगाओ पर्यावरण बचाओ’ हा यामागचा मुख्य हेतू आहे, असे पोलीस निरीक्षक, मानवी संसाधन विभाग रविकिरण घोडके यांनी सांगितले.