बार्शी : बार्शी तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने मृग नक्षत्रात खरीप पेरण्यांना वेळेवर सुरुवात झाली. या पंधरा दिवसांत तालुक्यात सरासरीच्या ५७,३८९ हेक्टरपैकी १३,३९६ हेक्टर (२३.३४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम म्हणाले की, तालुक्यातील दहा मंडळांत पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पडला. मात्र, नंतर तो तालुक्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पडला आहे. जून महिन्याची तालुक्याची पावसाची सरासरी ही १०७ मि.मी. आहे. जून महिन्यातील २१ दिवसांत तालुक्यात सरासरी दहा दिवसांत ११७.७ मिलिमीटर १०९ टक्के पाऊस पडला आहे. मात्र, या पावसामध्ये खंड असल्यामुळे काही भागात पेरणीची ओल कमी-अधिक प्रमाणात आहे. पेरणी झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची झाली आहे.
पेरणी झालेले क्षेत्र
सोयाबीन- ५८६४, तूर- १८८२, उडीद- ३५९४, मूग- ३५५, भुईमूग- ५.१, मका- ३१, कांदा- १०४ तर मिरची १७ हेक्टर याप्रमाणे खरीप हंगामात खरीप पिके व भाजीपाल्याची लागवड झाली आहे. दोन दिवसांपूर्वीही पाऊस पडला असल्यामुळे अद्याप काही भागांत वाफसा नाही. त्यामुळे पेरण्या संथगतीने सुरू आहेत.
-----
कृषी संजीवनी मोहीम सुरू
यावर्षी कृषी विभागाने कृषी संजीवनी मोहीम सुरू केली आहे़ यामध्ये सोमवारी बीबीएफ तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यात संतोष काटमोरे या शेतकऱ्याच्या शेतात या तंत्रज्ञानाद्वारे पेरणी करण्यात आली. या सप्ताहाचा शुभारंभ अरणगाव येथून करण्यात आला. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे फायदे, बीजप्रक्रिया, आदींबाबतची माहिती देण्यात आली.
----
विविध पिकांसाठी उपयुक्त माहिती
कृषी संजीवनी सप्ताहात बीजप्रक्रिया तंत्रज्ञान, कापसाचे एक गाव एक वाण, सुधारित भात लागवड, ऊस लागवड तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल अंतर्गत नावीन्यपूर्ण पिकांची लागवड तंत्रज्ञान, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व प्रसार, पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रोत्साहन, कीड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना व कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करून या सप्ताहाचा समारोप होणार असल्याचे शहाजी कदम यांनी सांगितले.
----२१बार्शी-पेरणी
बीबीएफ तंत्रज्ञानाने सोयाबीन पेरणी केलेल्या शेताचा फाेटो.
----
===Photopath===
210621\1948-img-20210621-wa0038.jpg
===Caption===
बार्शी तालुक्यात पेरण्यांना सुरुवात पहिल्या आठवड्यात 23 टक्के क्षेत्रावर झाल्या खरिपाच्या पेरण्या
जूनमध्ये सरासरी च्या 109 टक्के पडला पाऊस; पावसात मात्र खंड