शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

सिनेमा समाजाचा आरसा आहे, मधुर भांडारकर यांचे मत, सोलापूरात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:40 PM

चांदणी बार, पेज थ्री सारख्या अनेक चित्रपटांना रसिकांनी भरभरून दाद दिली़ आजवरचा अनुभव पाहता सिनेमा हा समाजाचा आरसा आहे़ रसिकांच्या प्रतिसादावरच बजेटमध्ये अनेक चित्रपट केले़ काही चालले, काही नाही चालले़ रसिकांनी चित्रपट पाहण्यात सातत्यपणा ठेवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केले़ 

ठळक मुद्देप्रिसिजन फाउंडेशन आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय ‘दुसºया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधुर भांडारकर यांना चांदीचे सन्मानपत्र देऊन सोलापूरकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला़‘म्होरक्या’ चित्रपट बनवणारे अमर देवकर आणि मनोज कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : चांदणी बार, पेज थ्री सारख्या अनेक चित्रपटांना रसिकांनी भरभरून दाद दिली़ आजवरचा अनुभव पाहता सिनेमा हा समाजाचा आरसा आहे़ रसिकांच्या प्रतिसादावरच बजेटमध्ये अनेक चित्रपट केले़ काही चालले, काही नाही चालले़ रसिकांनी चित्रपट पाहण्यात सातत्यपणा ठेवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केले़ प्रिसिजन फाउंडेशन आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय ‘दुसºया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे उद्घाटन भांडारकर यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ शुक्रवारी प्रभात टॉकीजमध्ये पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ़ जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक-कलावंत गजेंद्र अहिरे, एसआयआयएफचे चेअरमन यतीन शहा, सुहासिनी शहा, दीपक पाटील, आण्णासाहेब पाटील आणि  भरत भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी मधुर भांडारकर यांना चांदीचे सन्मानपत्र देऊन सोलापूरकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला़ तसेच वाढदिवसानिमित्त गजेंद्र अहिरे यांचा गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला़ ‘म्होरक्या’ चित्रपट बनवणारे अमर देवकर आणि मनोज कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला़ या उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ‍ॅन नो बडी’ टर्कि श फिल्मला सुरुवात झाली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले़ यावेळी अमोल चाफळकर आणि शिवरंजनीच्या कलावंतांसह चित्रपट रसिकांनी उपस्थिती दर्शवली़ ------------------------आविर्भाव कलाविष्काऱ़़- उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी ‘आविर्भाव’ कलाविष्कार पार पडला़ भारतीय संगीताच्या तालावर पाश्चिमात्य नृत्यशैलीचे सादरीकरण झाले़ अर्थात तन्वी शिंदे आणि आरती कंधारे या दोघींनी कंटेपररी, रविराज शिंदे आणि डॉ़ पूजा सुरवसे या दोघांनी सालसा तर सॅम्युअल (सनी) आणि ऋषीकेश पाटील यांनी हिपॉप एकाचवेळी सादरीकरण करून उपस्थित रसिकांमधून टाळ्यांची दाद मिळवली़ --------------------फिल्म फेस्टिव्हल एक चळवळ : अहिरे- प्रमुख अतिथी म्हणून बोलताना गजेंद्र अहिरे यांनी फिल्म फेस्टिव्हल एक चळवळ असल्याचे म्हणाले़ जगण्याच्या चौकटीवर फिल्म फेस्टिव्हलचा परिणाम होत असतो़ काय बघावे आणि काय बघू नये हे समजते असे सांगून मोबाईलमुळे खूप मोठी क्रांती झाल्याचा उल्लेख केला़ यामुळे एक फळी दूर झाली असून डायरेक्ट आॅडिशनची संधी नव्या पिढीला मिळाली आहे़ सिनेमा हा लार्जन दॅन लाईफ असून तो थिएटरमध्येच जाऊन पाहिला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली़ ----------------विमानतळ झाले तर येणे-जाणे वाढेल : जब्बार पटेल- यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ़ जब्बार पटेल यांनी संथगतीने सुरू असलेल्या विमानतळाचा मुद्दा आपल्या मनोगतातून उपस्थित करीत सोलापूरचे विमानतळ लवकर झाले तर दिग्दर्शकांचे येणे-जाणे वाढेल, असे  म्हणाले़ याचा फायदा सोलापूरलाच होईल, असे सांगत सोलापूरमधील त्यांचा आनंददायी प्रवास याप्रसंगी उलगडला़ प्रिसिजनची ख्याती जगभर गेली आहे़ हेच प्रिसिजन फिल्म फेस्टिव्हलदेखील जगभर नेईल़ एक वेगळी ओळख निर्माण करून देईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला़  

टॅग्स :SolapurसोलापूरMadhur Bhandarkarमधुर भांडारकर Filmfare Awardफिल्मफेअर अवॉर्ड