सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक दर देणारा म्हणून पांडुरंग सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. कारखाना स्थापनेपासून संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. काही ठिकाणी एक-दोन जागेसाठी निवडणूक लागली आहे. कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात जिल्ह्यात कारखाना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून त्यांनी नावारूपाला आणला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार प्रशांत परिचारक यांनीसुद्धा कारखान्याची धुरा व्यवस्थितरीत्या पार पाडत आहेत.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम कारखान्याला सूचनाफलक व जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण त्याचा प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग या कार्यालयातील सूचना फलकावर २२ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी १८ ऑक्टोबर २०२१ आहे. प्रत्यक्ष निवडणूक दिवाळीनंतर तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
............
अन् कारखान्याचे विस्तारीकरण
सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर चेअरमनपदावर आमदार प्रशांत परिचारक हे विराजमान झाल्यावर गेल्या एक वर्षात यांनी कारखान्याची गाळप क्षमता दहा हजार मेट्रिक टनावर केली. तसेच ९० लाख लिटर डिस्टलरीचे विस्तारीकरण केले. त्यामुळे कारखान्याच्या प्रगतीचा आलेख त्यांनी उंचावला आहे. त्याचाच फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
----
उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे प्रगती
पांडुरंग कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी डॉ. यशवंत कुलकर्णी विराजमान झाल्यानंतर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. गेल्या सात वर्षांपासून कारखान्यांच्या कामगारांचे पगार, शेतकऱ्यांच्या बिलाची रक्कम, शासकीय देणे हे वेळेवर देण्याचे काम त्यांनी केले. कारखान्याचे ताळेबंद पत्रक मजबूत केले आहे. त्यामुळेच पांडुरंग कारखाना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावारूपाला आणला.
----