चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील उत्तर भागातील जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर ठरणारा चपळगाव-तीर्थ या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कसरत होत आहे. अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. लोकमतने या प्रश्नावर प्रकाश टाकताच संबंधित विभागाकडून रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ केला.
या मार्गावरून प्रामुख्याने शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार प्रवास करतात. अनेक ठिकाणी मोठ्ठे खड्डे पडल्याने अलीकडच्या काळात काही अपघात झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित विभागाला पत्रव्यवहारदेखील झाला आहे. गुरुवारपासून रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ झाला आहे.
---
अक्कलकोट तालुक्यातील काही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही बाब खरी आहे. सध्या तालुक्यातून उसाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. संबंधित विभागाला रस्त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना कालावधीतील प्रलंबित कामांसोबतच पुढील अर्थसंकल्पात तालुक्यातील रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी भरीव निधीसाठी पाठपुरावा करणार आहे.
- सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट
--
तालुक्याच्या उत्तर भागात आणि कुरनूर धरणामुळे चपळगाव भागात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घेतले जाते. या ठिकाणाहून उसाची वाहतूक होते. तीर्थ रस्त्यावर खड्ड्यांमुळे अनेकदा वाहने पलटी झाली आहेत. अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब स्थितीतच आहेत. डागडुजी करणे हा तात्पुरता पर्याय असून नव्याने रस्ता होणे गरजेचे आहे.
- गणेश माने देशमुख
चेअरमन,जयहिंद शुगर्स, आचेगाव
----
फोटो : ०४ चपळगाव
चपळगाव- तीर्थ रस्त्याच्या डागडुजी कामाला सुरुवात झाली आहे.