शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

अखेर घाटणे बॅरेजमधून मोहोळसाठी पाणी सोडले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पेढे भरवून आनंद व्यक्त 

By काशिनाथ वाघमारे | Published: March 03, 2024 7:48 PM

मोहोळ शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी २ मार्चला रात्री १० वाजता घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले.

सोलापूर: मोहोळ शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी २ मार्चला रात्री १० वाजता घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. हे पाणी ३ मार्चला पहाटे ५:३० वाजता कोळेगाव बंधाऱ्यात पोहोचले आहे. ते पाणी १० एमटीएफसी एवढे आहे. मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आनंद व्यक्त केला. सीना नदीपात्रात अष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन केले. 

यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, तालुका उपाध्यक्ष हेमंत गरड, शहराध्यक्ष रुपेश धोत्रे, माजी नगरसेवक मुस्ताक शेख, शहर कार्याध्यक्ष नागेश बिराजदार, अतुल गावडे, दत्तात्रय खवळे, संतोष खंदारे, दाजी गाढवे, रफिक हरणमारे, गौतम क्षीरसागर, अझरुद्दीन शेख, गणेश पवार, संतोष धोत्रे, बाळू धोत्रे, शकील शेख, राजू सुतार, कल्पना खंदारे, यशोदा कांबळे, आदी उपस्थित होते. 

घाटणे बॅरेज बंधाऱ्यामधून १६ एफसीएफटी पाणी मोहोळच्या कोळेगाव बंधाऱ्यासाठी सोडून दिले होते. त्यापैकी सहा एमसीएफटी पाण्याचे नुकसान झाले असून, मोहोळच्या कोळेगाव बंधाऱ्यांमध्ये दहा एमसीएफटी पाणी साठले आहे. आता घाटणे बॅरेज बंधाऱ्यांमध्ये ५.२५ एमसीएफटी पाणी शिल्लक राहिले आहे. रात्री ग्रस्त वाढवा... विद्युत मोटारी बंद ठेवाराष्ट्रवादीच्या दोन गटांतील संघर्षातून आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात सोडण्यात आलेले हे पाणी आता नगरपरिषद प्रशासनाने जबाबदारी घेऊन टिकविले पाहिजे. आष्टे कोळेगाव परिसरामध्ये दिवसा व रात्रीची ग्रस्त ठेवून परिसरातल्या शेती पंपाच्या विद्युत मोटारी बंद ठेवल्या, तरच ते पाणी मोहोळ शहराला किमान दीड महिना पुरणार आहे. अन्यथा नदी परिसरातील विद्युत मोटारी सुरू राहिल्यास पंधरा दिवसांतच ते पाणी संपेल आणि पुन्हा मोहोळ शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर