अनगर : येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाची टाकी कोसळून झालेल्या अपघातात ज्योतिराम वगरे, सुरेश अंकुश चव्हाण (बिटले, ता. मोहोळ) हे दोन कामगार मरण पावले. इतर सहा जण जखमी झाले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा धनादेश कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, शहाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याच्या स्थापनेपासूनच संस्थापक अध्यक्ष राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, शहाजीराव पाटील आणि चव्हाण कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
-----
फोटो : ०५ अनगर
लोकनेते कारखान्यातील मृताच्या वारसांना मदतीचा धनादेश देताना चेअरमन बाळराजे पाटील, ओमप्रकाश जोगदे, शहाजीराव पाटील.