शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

खंडित वीजपुरवठ्यांअभावी सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:48 PM

पावसाळ्यातही त्रास; वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण

ठळक मुद्देसोलापुरी टेक्स्टाईल्स उत्पादनांना देशी बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाल्याने सध्या यंत्रमाग कारखानदार अडचणीत तयार मालाला बाजारात उठाव नसल्याने कारखानदारांची आर्थिक नाडी काहीशी मंद झालीपाच दिवसांचा आठवडा आणि रोजच्या वेळेत कपात केली असून उत्पादन निर्मिती तीस ते चाळीस टक्के घटवली

सोलापूर : सोलापुरी टेक्स्टाईल्स उत्पादनांना देशी बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाल्याने सध्या यंत्रमाग कारखानदार अडचणीत आहेत़ तयार मालाला बाजारात उठाव नसल्याने कारखानदारांची आर्थिक नाडी काहीशी मंद झाली आहे़ त्यामुळे त्यांनी उत्पादन प्रक्रियेला देखील ब्रेक दिला आहे़ पाच दिवसांचा आठवडा आणि रोजच्या वेळेत कपात केली असून उत्पादन निर्मिती तीस ते चाळीस टक्के घटवली आहे़ याचा सर्वाधिक फटका गरीब यंत्रमाग कामगारांना बसत आहे़ पाच दिवसांचा आठवडा झाल्याने कामगारांचे उत्पन्न देखील घटले आहे़ त्यामुळे कामगारांचे आर्थिक नियोजन देखील कोलमडले आह़े़ अशात आता दसरा आणि दिवाळी सारखा मोठा उत्सव उंबरठ्यावर असल्याने कामगारांची चिंता वाढत चालली आहे.

बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस कामगारांना साप्ताहिक सुुुट्टी दिली जात आहे़  या डबल सुट्टीचा धसका कामगारांनी घेतला असून सुट्टीच्या दिवशी कामगार दुसºया ठिकाणी कामाला जात आहेत़ काही कारखान्यात दिवसाचे टायमिंग बदलले असून रोजच्या वेळेत कपात करण्यात आली आहे़ सध्या यंत्रमाग उद्योगात कामगार आणि मालकांना अच्छे दिवस नाहीत़ अनेकदृष्ट्या हा उद्योग अडचणीत सापडला आहे़ विशेष म्हणजे, निर्यात देखील पन्नास टक्क्यांहून अधिक घटल्याने कारखानदारांची आर्थिक उलाढाल खूप कमी झाली आहे़ काही कारखानदार या उद्योगातून बाहेर पडताहेत तर काही मालक पॉवरलुम्स भंगारात विकायला काढत आहेत.

कामगारांच्या विविध प्रश्नावर कामगार संघटना वारंवार रस्त्यावर उतरतात़ मालक संघटना आणि कामगार संघटना वर्षातून एक-दोनवेळा आमनेसामने येतात़ बोनस प्रश्न, पगारवाढीच्या प्रश्नावर मालक आणि कामगारांचे खटके उडतात़ याचाही परिणाम उद्योगावर होत आहे, असे मालक सांगतात़ मागच्या वर्षी कामगारांच्या पीएफ प्रश्नावर कामगार संघटनांनी संप पुकारला होता.

सोलापुरी चादर आणि टॉवेल्सला देशीबाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती़ आता पानीपत तसेच तामिळनाडू येथेही चादर आणि टॉवेल्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे़ त्यामुळे सोलापुरी मार्केटला देशी मार्केटमध्ये उठावच नाही़ तसेच आहे त्या मालाला कमी रेट येत असल्याने मालक उत्पादन विक्रीला पुढे येईनात़ माल स्टॉकचे प्रमाण प्रचंड वाढले आहे़ त्यामुळे नवीन उत्पादन घेण्याचे धाडस मालक करणार नाहीत़ दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत चालल्याने उत्पादनाची किंमत देखील वाढत आहे़ - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष,सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ

यंत्रमाग कामगार गरीब आहेत़ सहा दिवस काम केल्यानंतर त्यांना हजार ते पंधराशे रुपये मजुरी मिळते़ यात त्यांच्या परिवाराचे पालनपोषण होणे अशक्य आहे़ यातून मार्र्ग काढत कामगार संसाराचा गाडा हाकत असतात़ बाजारात मालाला उठाव नसल्याचे कारण सांगत बहुतांश कारखानदारांनी आता पाच दिवसांचा आठवडा केला़ यामुळे कामगारांची मजुरी आणखीन कमी झाली़ कामगारांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कटले आहे़ कामगार बेजार झाला आहे़  कामगारांचे भविष्यात कसे होणार, याची चिंता आम्हाला सतावत आहे़- श्रीधर गुडेली, कार्याध्यक्ष, मनसे यंत्रमाग कामगार संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगbusinessव्यवसायmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन