शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
3
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
4
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, घसरणीसह सेन्सेक्स-निफ्टीची उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
5
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
6
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
7
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
8
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
9
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
10
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
11
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
12
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
13
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
14
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
15
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
16
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
17
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
18
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
19
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?

सोलापुरात टेक्स्टाइल कारखान्यास लागलेली आग सात तासांनंतर आटोक्यात

By विलास जळकोटकर | Published: April 03, 2024 6:34 PM

अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळी नऊपासून सुरू झालेले मदतकार्य दुपारी चार वाजेपर्यंत चालले.

सोलापूर: एकीकडे सूर्य आग ओकत असताना अक्कलकोट एमआयडीतील अन्नपूर्णा टेक्स्टाईल कारखान्याला बुधवारी सकाळी ८:१५ च्या सुमारास आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळी नऊपासून सुरू झालेले मदतकार्य दुपारी चार वाजेपर्यंत चालले. तब्बल सात तासांनंतर ही आग आटोक्यात आणली गेली.

अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये ई८८/३ या जागेत प्रमोदकुमार गुलाबचंद दरगड (वय ५५) यांचा अन्नपूर्णा टेक्स्टाईल कारखाना आहे. येथे विविध प्रकारचे सुताचे टॉवेल तयार होतात. बुधवारी कारखान्याला सु्टी असल्यामुळे कारखाना बंद होता. सकाळी ८:१५ सुमारास बंद असलेल्या कारखान्यातून धूर येऊ लागल्याने मालकाला खबर देण्याबरोबरच ८:३० च्या सुमारास अग्निशामक दलाच्या कार्यालयाला कॉल करण्यात आला. ८:४५ च्या सुमारास एकापाठोपाठ भवानी पेठ, रविवार पेठ, सावरकर, होटगी रोडवरील अग्निशामक दलाच्या गाड्या मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांनी तातडीने घटनास्थळी पाठवल्या. सकाळी नऊ वाजल्यापासून आग आटोक्यात आणण्यासाठी सुरुवात झाली.एकीकडे प्रचंड उष्मा आणि आगीचे लोळ यांमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना शिकस्त करावी लागली. पाण्याचा प्रेशरने मारा करावा लागला. यासाठी खासगी पाण्याच्या टँकरचीही मदत घेण्यात आली. सर्वांच्या प्रयत्नांनी अखेर दुपारी चार वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आगीच्या भक्ष्यस्थानी काय पडलंया भीषण आगीमध्ये कारखान्यातील कच्चा व पक्का माल जळून खाक झाला. शिवाय पूर्ण पत्राशेड, इलेक्ट्रिक वायरिंग, डबलिंग मशिन, शिलाई मशिन पूर्णत: निकामी झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारच्या सुटीमुळे मनुष्यहानी वाचलीबुधवारच्या सुटीमुळे कारखाना बंद होता. कारखाना चालू असताना ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुटीमुळे मनुष्यहानी वाचल्याच्या भावना घटनास्थळी लोकांमधून व्यक्त झाल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग