यावेळी राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला चे प्राचार्य सुधीर गायकवाड ,पर्यवेक्षक संतोष गायकवाड, विजयश्री गायकवाड अशोक पाचकुडवे, अण्णासाहेब नागणे, विद्या देशमुख, पल्लवी तोडकर, संदीप गायकवाड, नानासाहेब ताकमोगे, रावसाहेब सुर्वे आदी उपस्थित होते
यावेळी बाबर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी कसा घडवावा, विद्यार्थ्यांशी समाजाशी, संस्थेशी, शिक्षकांची कशी भूमिका असावी याबाबत मार्गदर्शन केले. आभार विजयाश्री गायकवाड यांनी मानले.
----
विद्यार्थी हेच आपले दैवत आहे. विद्यार्थी आणि विद्यालयाशी शिक्षकाचे नाते अतूट असले पाहिजे. शिक्षकांनी जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलणार नाही. ज्ञानाने नम्रता येते आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते. ज्ञान सौंदर्य आणि चांगुलपणा ही जीवनाची मूल्ये आहेत ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवा.
- भास्करराव बाबर, माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी
----