ठळक मुद्देकोरोनाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थ एकवटलेकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गावात जनजागृती वर भरतावशी गावात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरूच
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयात सँनिटायझर पंप बसवला आहे. गावात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे असा उपक्रम राबवणारे तावशी ग्रामपंचायती महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत असल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.
या सँनिटायझर पंपाचा शुभारंभ करण्यासाठी सरपंच सोनाली यादव, मंडल अधिकारी बी. आर. मोरे, ग्रामसेवक ज्योती पाटील, तलाठी घोगरदरे, बाळु काका यादव, पोलीस पाटील कविराज आसबे, आरोग्यसेवक डॉ. साळुंखे, बागल व सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविका ग्रांमपंचायत कर्मचारी उपस्थित होते.