कारखान्याची गाळप क्षमता १२५० मे.टन इतकी कमी असल्यामुळे यंदा कोणत्याही बँकेने कारखान्यास कर्ज दिले नाही.म्हणून संचालकांची मालमत्ता गहाण ठेवून कारखाना चालवित असल्याचे कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी कारखान्याच्या वार्षिक सभेत सभासदांना बोलताना सांगितले.
पडसाळी ता माढा येथील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा सोमवारी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष ॲड.धनाजी साठे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला श्री संत कुर्मदास महाराज, सहकार महर्षी कै.गणपतराव साठे व कै.विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी स्वागत व प्रास्तविक दादासाहेब साठे यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
कारखाना चालविण्यास कर्जा उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवेढा येथील धनश्री परिवाराचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे व धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्षा शोभाताई काळुंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेचेही त्यांंनी यावेळी सांगितले. यावेळी व्दितीय विशेष लेखा परिक्षक बी.यु.भोसले यांचा सत्कार कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष ॲड. श्री.धनाजी गणपतराव साठे यांचे शुभहस्ते करण्यात आला.कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक बी.डी.पवार यांनी विषय पत्रिकेनुसार अहवाल वाचन केले.त्यास सर्व सभासदांनी सर्व विषयास टाळयांच्या गजरात मंजूरी दिली.
अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष ॲड.धनाजी साठे म्हणाले की, साठे परिवारवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या, सर्व संचालक मंडळाच्या आणि ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या पाठबळामुळे संत कुर्मदास कारखाना उभा असून तो अनंत अडचणीवर मात करीत चालु आहे. भविष्यात उभारण्यात येणऱ्या डिस्टीलरी प्रकल्पामुळे गाळप क्षमतेची वाढ होणार आहे.यामुळे सभासदांनी चांगल्या रिकव्हरीचा ऊस देवून सहकार्य करावे. तसेच कोव्हीड १९ नियमांचे पालन करावे मास्क बांधावे व कोव्हीडवर मात करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले आहे.
या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिरीषकुमार पाटील, संचालक भालचंद्र पाटील, भारत पाटील, अरुण लटके,ज्ञानदेव ऊबाळे, सुधीर पाटील, हरिदास खताळ, राहुल पाटील, बाळासाहेब व्यवहारे, प्रताप पाटील, रोहिदास कदम,शिवाजी पाटील, संजय इंगळे, रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी कमिटीचे बाळासाहेब पाटील ,मार्गदर्शक बी.डी.पाटील, अंजनगांवचे आदिनाथ इंगळे, इंगळे सर,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सौदागर जाधव, बालाजी पाटील, कृषी उत्पन्न् बाजार समिती संचालक संतोष पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, नितीन साठे, हिंन्दु खारे, धनाजी यादव, प्रशांत यादव,व सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगरसभासद, शेतकरी, हितचिंतक, सर्व खातेप्रमुख, कामगार वर्ग आदि उपस्थित होते.यावेळी फोटो ओळ-
पडसाळी ता.माढा येथील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा सोमवारी सकाळी अकरा वाजता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी सभासदांना बोलताना कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष ॲड.धनाजी साठे