मायलेकाच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावामध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागही हतबल झाला आहे. आजपर्यंत गावामध्ये एकूण २१ जणांचे विविध कारणांनी निधन झाले आहे, तर २१ पैकी ६ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे. आजअखेर पॉझिटिव्ह संख्या ९० झाली आहे. त्यातील ३० जण कोविड सेंटर येथे उपचार घेऊन घरी परतले आहेत. बाकीचे कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत. काही जण सोलापूर, पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
रवींद्र मोटे शेती व्यवसाय करत होते. अल्पावधीतच द्राक्षबाग लावून त्यांनी प्रगती साधली होती. ऐन तारुण्यात त्यांचे निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आई रतनबाई लक्ष्मण मोटे यांचे पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले. यामुळे आईपाठोपाठ घरातील कर्ता मुलगा गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे. रवींद्र मोटे यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, भावजई असा परिवार आहे.
----