शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

राज्यातील पहिले ‘रेशीम पार्क’ तीन वर्षांनंतरही लटकलेलेच, जागेचे शुक्लकाष्ट संपेना

By admin | Published: June 23, 2017 2:32 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केलेल्या राज्यातील पहिल्या‘रेशीम पार्क’च्या उभारणीचा प्रश्न तीन वर्षांत मार्गी लागू शकला नाही. अगोदर बीबीदारफळ येथील जमिनीला ‘माळढोक’ची अडचण सांगितली जात होती आता हिरजच्या जागेचे प्रकरण न्यायालयात आहे.राज्यात वरचेवर तुतीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. अगोदर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असलेली तुतीची शेती आता राज्यभरात व्यापली आहे. वरचेवर तुतीचे क्षेत्र वाढत असल्यानेच तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील पहिले ‘रेशीम पार्क’सोलापूर जिल्ह्यात मंजूर केले होते. रेशीम पार्कच्या मंजुरी आदेशातच उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावावरील गायरान जमीन ताब्यात घेण्याबाबत म्हटले होते. शासन आदेशानंतर बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावावरील ५७६ गट नंबरमधील ५१.१९ हेक्टरपैकी २५ हेक्टर जमीन संचालक रेशीम उद्योग संचालनालय नागपूर यांच्या नावे करण्यात आली. उर्वरित २६ हेक्टर १९ आर जमीन ही आजही बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावे आहे. ‘रेशीम पार्क’उभारणीसाठी ही जमीन रेशीम उद्योग संचालनालयाच्या नावे करण्यात आली खरी ; मात्र स्वतंत्र उतारा तयार करताना ‘माळढोक’ पक्षी अभयारण्याचा अडथळा आला. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील खासगी क्षेत्र माळढोकमधून वगळण्यात आले; मात्र हे क्षेत्र वगळण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्यानंतर बीबीदारफळ ऐवजी दुसऱ्या जागेचा शोध सुरु झाला. जिल्हा रेशीम विकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमीन उपलब्ध करण्यासाठी पत्र दिले. त्यानुसार हिरज येथील गट नंबर ४२३ मधील चार हेक्टर जमीन देण्यात आली. ग्रामपंचायतीची गावठाण जमीन असल्याने ठरावाद्वारे ‘रेशीम पार्क’साठी देण्यात आली; मात्र याचा वाद आता न्यायालयात सुरू आहे.--------------------------थकबाकीत करमाळ्याची आघाडी.........च्थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये करमाळ्याची आघाडी असून, १३ हजार २८६ शेतकऱ्यांकडे १०५ कोटी ४७ लाख तर दक्षिण सोलापूर तालुक्यात ५४२९ शेतकऱ्यांकडे ९३ कोटी ६२ लाख इतकी थकबाकी आहे, मंगळवेढा तालुक्यात ७२३८ शेतकऱ्यांकडे ८७ कोटी ४२ लाख, बार्शीच्या १४ हजार ५३२ शेतकऱ्यांकडे ८२ कोटी ६२ लाख, माढ्याच्या ७६४२ शेतकऱ्यांकडे ८१ कोटी ६० लाख, अक्कलकोटच्या ८६३४ शेतकऱ्यांकडे ७९ कोटी ४२ लाख, पंढरपूरच्या ४९०५ शेतकऱ्यांकडे ४१ कोटी ९६ लाख. अन्य चार तालुक्याची थकबाकी यापेक्षा कमी आहे.