सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवाप्पा लाला शिंदे (रा. खरसोळी) यांच्या आई सुनीता लाला शिंदे (वय ६०) यांना सुलक्षणा सिद्धेश्वर शिंदे या दोन महिन्यांपासून २२ जानेवारी २०२१ पर्यंत सतत मारहाण करून भांडण करत होती. तसेच नंदू यमाजी चव्हाण, रिंगण नंदू चव्हाण, लताबाई नंदू चव्हाण, कालीदास देवीदास चव्हाण, अजय देवीदास चव्हाण, हनुमंत काळे (सर्व रा. टाकळी) व पांडुरंग काळे (रा. आढीव) यांनी वेळोवेळी त्रास दिला.
या सर्वांच्या त्रासास कंटाळूनच माझी आई सुनीता हिने विष प्राशन केले. यानंतर तिला उपचारसाठी अॅपेक्स हॉस्पिटल येथे दाखल केले. सुनीता हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे वरील सर्वांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार देवाप्पा शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर करीत आहेत.
खासगी रुग्णालयाच्या काचा फोडल्या
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आमचा रुग्ण दगावला, असा आरोप करत मयत महिला सुनीताच्या (वय ६०) यांच्या नातेवाइकांनी पंढरपुरातील खासगी रुग्णालयाची काच फोडली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घडल्या प्रकाराबाबत अपेक्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बोहरी यांना विचारले असता, त्यांनी समोर पोलीस उभे आहेत, असे सांगून माहिती देण्याचे टाळले.
फोटो २३पंड०१
पंढरपूर येथील अॅपेक्स हॉस्पिटलची काच फोडल्यानंतर हॉस्पिटलसमोर लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.