शहरातील नेहरू नगर परिसरात अनेक वर्षांपासून गटारी तुंबतात. यामुळे या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागिरकांना नाक मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. या भागात ५०० हून अधिक लोक राहतात. नागरिकांनी तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. आधीच कोरोनाने थैमान माजवलेले असताना डेंग्यू, मलेरियाचीही साथ वाढली आहे. नागिरकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुर्डूवाडी उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत. पिण्याच्या पाण्याचे नगरपरिषदकडील सार्वजनिक नळ कनेक्शनदेखील येथील नागरिकांना अद्याप दिले गेले नाहीत. त्यामुळे येथील सार्वजनिक शौचालयासाठी जे पाणी नगरपरिषदेकडील पाईपलाईनद्वारे येते तेच पाणी येथील नागरिक पिण्यासाठीही वापरत आहेत. ही बाब धक्कादायक असून, याबाबत मनसे भविष्यात तीव्र आंदोलन उभे करणार आहे.
निवेदन देण्यासाठी मनसेचे करमाळा-माढा विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे, शहराध्यक्ष ओंकार चौधरी, वाहतूकसेना कुर्डूवाडी शहराध्यक्ष राजेंद्र भिसे, नेहरुनगर शाखाध्यक्ष गणेश खिलारे, अमोल घोडके, सचिन कांबळे, संदीप मोरे, आशिष अरसुले, अजय खिलारे, सुधीर कांबळे, विजय कांबळे, आनंद खिलारे, सूरज अस्वरे, विशाल कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
--
दलित वस्ती कामे कागदावरच
नेहरूनगरमध्ये शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनांतर्गत आतापर्यंत दाखविलेली कामेही फक्त कागदावरच केली जातात काय असाही आरोप त्यांनी केला आहे.
----
नेहरूनगरमधील गटार नालीतील तुंबलेली घाण गेल्या दोन दिवसांपासून काढण्याचे काम सुरू आहे. आमच्या विभागांतर्गत येणारे स्वच्छतेचे काम लवकरच पूर्ण करत आहोत. बाकीचे शौचालय बांधकामाबाबतचे प्रश्न बांधकाम विभागाकडील असल्याने त्यात आमचा अधिकार नाही.
- तुकाराम पायगण, आरोग्य निरीक्षक, नगरपरिषद, कुर्डूवाडी
----
220921\img-20210918-wa0239.jpg~220921\img-20210918-wa0250.jpg~220921\img-20210918-wa0255.jpg
कुर्डूवाडी येथील नेहरू नगरमधील गटार नाली तुबल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे हीच ती गटार नाली छायाचित्रात दिसत आहे.~कुर्डूवाडी येथील नेहरू नगरमधील गटार नाली तुबल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे हीच ती गटार नाली छायाचित्रात दिसत आहे.~कुर्डूवाडी येथील नेहरू नगरमधील गटार नाली तुबल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे हीच ती गटार नाली छायाचित्रात दिसत आहे.