दीपक दुपारगुडे
सोलापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच मंदिरे बंद आहेत; मात्र जुन्या रुढी, प्रथा, परंपरा, चालीरिती काही बंद होत नाहीत. आषाढ महिन्यात विविध देवतांना नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. कोरोनाच्या काळात देखील ही परंपरा जोरात सुरू असून, देवदेवतांच्या मूर्तीसमोरील नैवेद्याने पाचशे लोकांची भूक मात्र भागतेय.
आषाढ महिन्यात लक्ष्मीआई , मरिआई, मावलाई, मारुती, म्हसोबा या देवतांना नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. सिव्हिल येथील महालक्ष्मी मंदिर, विजापूर वेस येथील मरिआई मंदिर, मरिआई चौकातील मरिआई मंदिर आणि रुपाभवानी मंदिर येथे आलेल्या नैवेद्यामुळे पाचशे लोकांची भूक भागवली जात आहे.
तर देवतांपुढे ढिगाºयाने हेच ठेवलेले नैवेद्य वजा अन्न काही गरीब कुटुंबाची भूक भागवताना दिसत आहे. हे ठेवलेले नैवेद्य काही माणसे, लहान मुले गोळा करून घरी नेतात.
१० रुपयाला पाच नारळ वाट्याशहरातील अनेक मंदिरांमध्ये आषाढ महिन्यातील आलेले नैवेद्य अनेक गोरगरिबांना वाटप केले जाते; मात्र देवासमोर आलेले नारळ मात्र हॉटेल व्यावसायिक आणि भाविकांना दिले जातात, कोरोना काळाच्या अगोदर दहा रुपयात तीन नारळाच्या वाट्या मिळत होत्या, आता आषाढ महिन्यातील मंदिरातील गर्दी वाढली आहे.त्या वाट्या दहा रुपयाला पाच अशा विकल्या जात आहेत.
असे होते नैवेद्याचे वाटपसिव्हिलमधील महालक्ष्मी मंदिरात आलेल्या नैवेद्याचे वाटप दीडशे गोरगरीब आणि बेघर लोकांना पुजारी वाटप करतात. विजापूर वेस येथील मरिआई मंदिरात आलेले नैवेद्य गोरगरिबांना वाटप केले जाते. याचबरोबर बोरामणी येथून खास नैवेद्य घेण्यासाठी नामदेव रिक्षा करून येऊन आपल्या नातेवाईकांमधील वीस कुटुंबांना नैवेद्य वाटप करतात त्यामुळे येथून जवळपास ८0 लोकांची भूक भागते असे नामदेव सांगतात.
रुपाभवानी मंदिरात देखील आलेल्या नैवेद्याचे वाटप गोरगरिबांना केले जाते, त्यामुळे आसपासच्या १०० लोकांची भूक भागते तसेच जास्त प्रमाणात नैवेद्य आल्यास शहरातील अन्य संस्थेमार्फत ते बेघर आणि गरजू लोकांना वाटप केले जाते असे पुजाºयांनी सांगितले.मरिआई चौकातील मरिआई मंदिरात आलेल्या नैवेद्याचे वाटप येथील तिन्ही पुजाºयांमार्फत कोनापुरे चाळ, लष्कर येथील शंभर गरजवंतांना केले जाते. याचबरोबर देवासमोर वाढवण्यासाठी आलेले नारळ देखील लोकांना वाटप केले जातात असे पुजारी माडे यांनी सांगितले.