याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन श्यामसुंदर घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, कुगाव येथे उजनी जलाशयात दोन यांत्रिक फायबर बोटीच्या साहाय्याने वाळूचोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ५ रोजी पहाटे २ वाजता तेथे छापा टाकला असता, नदीतील वाळू बेकायदेशीर उपसा करताना आढळून आले. त्यांच्याकडे १२ लाखांच्या दोन बोटी सापडल्या. १ लाख २० हजार रुपयांची १२ ब्रास वाळू सापडली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी या बोटींचा व वाळूचा पंचनामा करून वाळूसह बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या आहेत.
याप्रकरणी मफजूल शेख, महेबूब शेख, रफिकहूल शेख, माबूद शेख (सर्व रा. अकुलबना, झारखंड), तसेच पांडुरंग प्रल्हाद मोरे (रा. चिखलठाण) व दुसऱ्या बोटीचे मालक हनुमंत रेडके (रा. कालठण नं. १, ता. इंदापूर) यांच्यावर वाळूचोरी व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे करत आहेत.
फोटो
०६करमाळा-क्राइम
ओळी : कुगाव, ता. करमाळा येथे वाळूच्या फायबर बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या.