शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

बार्शीतील पाच लघू प्रकल्प पूर्णत: भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:27 AM

बार्शी : यंदा पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली असून, बार्शी तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदी, ...

बार्शी : यंदा पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली असून, बार्शी तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील सर्व सिमेंट बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पाझर तलावात सरासरी शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्यम व लघू प्रकल्पातही सरासरी ८० टक्के पाणीसाठा झाला आहे.

तालुक्यात चार मध्यम प्रकल्प व १५ लघू प्रकल्पाबरोबरच २३० पाझर तलाव, ११८ के.टी. वेअर, सहा गावतलाव, जवळपास ६०० सिमेंट बंधारे आहेत. यांची पाणी साठवण क्षमता सात टीएमसी एवढी आहे. या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर बागायती क्षेत्र अवलंबून आहे.

जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक १५ लघू तर चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना व बागायती शेती अवलंबून आहेत. दोन वर्षे चांगला पाऊस झाल्याने, सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते.

----

मध्यम व लघू प्रकल्पाची साठवण क्षमता

हिंगणी - १६०७-५६ टक्के, जवळगाव- १२३३१०- ३२.६९ टक्के, ढाळेपिंपळगाव- ४१७१८-४१.२३ टक्के, तर लघू प्रकल्पामध्ये पाथरी- ४१९़४७-५९.३२ टक्के, बाभुळगाव- २२६-१० टक्के, कोरेगाव- ८५५-१०० टक्के, चारे- ५३४- १०० टक्के, वालवड- ४२४-१०० टक्के, काटेगाव- ४१९-१०० टक्के, कळंबवाडी- ९५१३- १०० टक्के, ममदापूर- ८९२५-३४.५२ टक्के, गोरमाळे- ६१६०- ९०.२२ टक्के, कारी- ६०१०- ३६.६५ टक्के, तावडी- ४४८- ४४.३५, वैराग- ५१४०- ३३.१० टक्के याप्रमाणे पाणीसाठा झाला आहे.

---

सर्व बंधारे, पाझर तलाव तुडुंब

तालुक्यात लघू पाटबंधारे, कृषी विभाग व जलसंधारण विभाग यांचे पाझर तलाव व सिमेंट बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. लघू पाटबंधारे यांचे ११३ पाझर तलाव व कोल्हापूर पद्धतीचे ११० बंधारे आहेत. त्यातील ६५ बंधाऱ्याला पडदी टाकून सिमेंट बंधाऱ्यात रूपांतरित केले आहे. २८३ सिमेंट बंधारे आहेत. हे सर्व बंधारे भरले आहेत. तलावात ९० टक्के पाणी जमा झाले आहे. जलसंधारण विभागाचे ११७ पाझर तलाव आहेत, त्यात ही ९० टक्के पाणी जमा झाले आहे.