गुजरात-बडोदा येथे भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत असणारे हणमंत काळे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील मित्रांच्या मदतीने खरसोळी (ता.पंढरपूर) येथे एक हजार झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी ते बोलत होते. सुभेदार हणमंत काळे हे सुट्टीवर गावाकडे आल्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढली होती. संपूर्ण गावात तीन ते चार वेळा सॅनिटायझर फवारणी, मास्कवाटप, अर्सेनिक अल्बम ३०च्या गोळ्या व कोरोनाबाधित रुग्णांना औषध किटचे वाटप सुभेदार हणमंत काळे यांनी केले आहे.
यावेळी सुभेदार हणमंत काळे, सहकार शिरोमणीचे संचालक राजूबापू पाटील, शेतकरी संघटनेचे छगन पवार, सरपंच महेश कसबे, नगर अभियंता नेताजी पवार, माजी सरपंच दिगंबर कांबळे, मोहन काळे, नेताजी काळे, अशोक पाटील, अतुल पवार, सुनील कांबळे, लहू पवार, समाधान भोसले, युवराज काळे, ज्योती काळे, नेताजी काळे, मोहन कसबे, जनार्दन पवार, लक्ष्मण पवार, अतुल पवार, शंकर पवार, विकास पवार, युवराज काळे, अमर पवार, अंगत पवार आदी उपस्थित होते.
कोट :::::::::::::::::::::::::
वर्षभरात चिंच, जांभूळ, वड, उंबर, गुलमोहर, रेन्टाक, सिर्स, रिगल, लिंब, बदाम, करंज असे ऑक्सिजन निर्मिती करणारी व पर्यावरणाचा समतोल टिकविणारे पाच हजार वृक्षलागवड केली जाणार आहे.
- सुभेदार हणमंत काळे, खरसोळी