शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

थकबाकीअभावी सोलापूर शहरातील बीएसएनएलचे पाच टॉवर सील, मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:07 PM

७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देशहरात दूरसंचार खात्याचे २२ मोबाईल टॉवर भाड्याच्या जागेत आहेत७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवरवसुलीसाठी रिलायन्सवर कारवाई केली जाईल : उपायुक्त ढेंगळे—पाटील

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१  :  ७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. शहरात दूरसंचार खात्याचे २२ मोबाईल टॉवर भाड्याच्या जागेत आहेत. या टॉवरचा भाडे कर दूरसंचार कंपनीने गेल्या कित्येक वर्षांत भरलेला नाही. त्यामुळे मनपाच्या करसंकलन विभागाचे प्रमुख आर. पी. गायकवाड यांनी बाळीवेस कार्यालयातील सरव्यवस्थापकांना कर भरण्याबाबत वारंवार नोटिसा बजाविल्या होत्या. थकीत कराबाबत दूरसंचारच्या कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केल्यावर दूरसंचार खात्याच्या अधिकाºयांनी केंद्र शासनाच्या उपक्रमास हा कर लागू होत नाही, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल दाखविला आहे.   महाराष्ट्र शासनाने मात्र याबाबत १६ मे २०१७ रोजी अध्यादेश काढून मालमत्ता कर आकारणीबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. केंद्र शासनाच्या कार्यालय व इतर इमारतींना सेवा कर लागू असल्याचे यात स्पष्ट केले आहे. त्याप्रमाणे मनपाने भाडे करारावर हा कर  लागू केला आहे. सोलापूर दूरसंचार कार्यालयाकडून ७६ लाख इतकी टॉवरची थकबाकी आहे. हा कर भरण्यास अधिकाºयांनी चालढकल केल्याने सोमवारी पाच टॉवर सील करण्यात आले. कारवाई सुरू असताना दूरसंचारच्या अधिकाºयांनी मनपाशी संपर्क साधून वरिष्ठांशी संपर्क सुरू आहे,कर भरू असे सांगितले.पण करभरल्या शिवाय सील काढले जाणार नाही असे ठणकावण्यात आले.रिलायन्सवर होणार कारवाई...मनपाने फक्त दूरसंचारच्या टॉवरवर कारवाई केली अशा तक्रारी आल्याने इतर कंपन्यांची थकबाकी काढण्यात आली आहे. त्यात रिलायन्स कंपनीचे शहरी विभागात जुने १९ टॉवर आहेत. या टॉवरची १६ लाख ११ हजार ८१७ रुपये थकबाकी व चालू वर्षाचा कर ९ लाख १ हजार ३२८ अशी २५ लाख १३ हजार १४५ रुपये इतकी थकबाकी आहे. या रकमेच्या वसुलीसाठी रिलायन्सवर कारवाई केली जाईल असे उपायुक्त ढेंगळे—पाटील यांनी स्पष्ट केले.-------------------हे टॉवर केले सील...४१५ लाख थकबाकीपोटी दूरसंचारचे पुढील टॉवर वीज व बॅटरी कनेक्शन बंद करून सील करण्यात आले आहेत. डफरीन चौक : डॉ. सतीश वळसंगकर कॅम्पस (३ लाख ३५ हजार), कुमार चौक: पंडित वाघे (२ लाख ७२ हजार), उत्तर सदर बझार: कारभासे बंगला (२ लाख ९३ हजार), दत्तनगर: आडकी बंगला (२ लाख ८२ हजार), जुना अक्कलकोट नाका:  गंगा टॉवर (३ लाख). उर्वरित १७ टॉवर मंगळवारी सील करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBSNLबीएसएनएल