शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट १५ सप्टेंबर पूर्वीच करा : राजेंद्र भोसले

By admin | Published: May 02, 2017 5:00 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. ०२ :- ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट येत्या १५ सप्टेंबर २०१७ पूर्वीच पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्याने ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण केले. यावर्षी ही हे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे.पण हे काम १५ सप्टेंबर २०१७ पूर्वीच पूर्ण व्हायला हवे. ध्वज दिन निधी संकलनासाठी देण्यात आलेल्या जुन्या पावत्या आणि ध्वज सैनिक कल्याण कार्यालयाकडे जमा करण्यात याव्यात. पावत्या हरवल्या असतील तर तसे पैसे भरुन टाकावेत.माहिती अधिकार कायद्याखालील प्रलंबित अर्ज निकालात काढण्यासाठी मोहिम राबवावी. माहिती अधिकार कायद्याखालील कलम चारच्या नियमानुसार आपआपल्या विभागाची माहिती वेबसाईटवर अद्यावत करण्यात यावी. ज्या विभागाकडे माहितीचा अधिकाराखाली जास्त अर्ज प्रलंबित आहेत. त्यांचा स्वतंत्र आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या.पुढील महिन्यापासून सेवा हमी कायद्याखाली दिल्या जाणा-या सेवाचांही आढावा घेतला जावा. असे भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध अर्ज येतात हे अर्ज संबंधित विभागाकडे पाठवले जातात पण त्या अजार्ला काय उत्तर दिले याची माहिती मिळत नाही. अशा प्रकरणात दिलेल्या उत्तरांची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात यावी, असे भोसले यांनी सर्व अधिका-यांना सांगितले.गेल्या वर्षी जिल्ह्यात किती झाडे लावली त्यापैकी किती जगली याचा आढावा घ्यावा आणि अहवाल सादर करा. यंदाच्या मोहिमेचेही नियोजन करावे, अशा सूचना भोसले यांनी वन विभागाच्या अधिका-यांना दिल्या. दरम्यान आज झालेल्या लोकशाही दिनात चार नवे अर्ज दाखल झाले या चार आणि प्रलंबित तीन अर्जावर संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाही करावी असे भोसले यांनी सांगितले. बेठकीस जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.----------------बुके ऐवजी बुक द्या ""दरम्यान श्री. भोसले यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनेक व्यक्तीनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बुके ऐवजी बुक दिल्यास मला आवडेल, असे राजेंद्र भोसले यांनी सांगितले.