दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे भीमा-सीना नद्यांचा संगम होतो. गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला उजनी जलाशयातून सोडण्यात आलेल्या स्वच्छ निळ्याशार पाण्याचा प्रवाह वाहत आहे. हत्तरसंग-कुडल येथील संगमात सीना नदी भीमेला येऊन मिळते. भीमा नदीला पावसाच्या गढूळ पाण्याचा महापूर आला आहे. हे गढूळ पाणी संगमात भीमेला मिळतानाचे विहंगम दृश्य पहायला मिळत आहे. दोन्ही नदीकाठच्या हिरव्यागार झाडाझुडपांनी येथील सौंदर्यात भर पडत आहे. हे देखणे सौंदर्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे.
----१० हत्तरसंग कुडल संगम
नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी
श्रावण महिन्याच्या समाप्तीला श्री संगमेश्वराला अभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली होती. तब्बल दोन वर्षांनंतर मंदिराचा परिसर भाविकांच्या लगबगीने फुलून गेला आहे. दोन दिवसांपासून सोलापूर शहरातून अनेक पर्यटक हत्तरसंग - कुडल येथील मंदिराकडे धाव घेत आहेत. बुधवारी आणि गुरुवारी देवस्थान दर्शनाबरोबर संगमातील नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत.
----