श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पंढरपुरातील भाविक युवराज शरण्णाप्पा मुचलंबे (रा. दाळेगल्ली, पंढरपूर) यांच्यावतीने मंदिरात सजावट करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप विविध फुलांनी सजविण्यात आले होते. या फुलांमध्ये झेंडू, गुलछडी, गुलाब व लिली या १५०० किलो देशी-विदेशी फुलांचा वापर करून मंदिर सजवले आहे. रंगबेरंगी फुलांच्या सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
:::::बैलपोळा साजरा :::::
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बैलपोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी बैलाची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावर-देशमुख, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केली.
फोटोओळ ::::::::::::::::::::::
श्रावणी पाचव्या सोमवारनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केलेली फुलांची आरास.