सोलापूर : अन्न, पाण्याच्या शोधात गेली अनेक दिवसांपासून पश्चिम घाटातील काही वानरं ही हद्दवाढ भागात कुमठे, विमानतळ, मजरेवाडी परिसरात दाखल झाली आहेत. टोळक्यांनी फिरणा-या या वानरांना या भागातच अन्न, पाणी मिळत राहिल्याने धुमाकूळ घालत आहेत. तशी ती जंगली असून न छेडता त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.
गेली महिनाभरांपासून काही वानरांची टोळी ही हद्दवाढ भागात वावरताना आढळत आहे. विशेषत: सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान या वेळेत ही वानरं टोळक्याने फिरताना आढळत आहेत. कुमठे परिसरात अनेकजण त्यांना वानर म्हणजे हनुमानाचे अवतार समजून त्यांना खायला घालताहेत. काही लोक चपाती, केळी, पेरु अशी फळं देतातहेत. याशिवाय आंब्याचा मोहोर, हिरवी पानं त्यांना उपलब्ध होत आहेत. सध्या मानवी वस्तीत त्यांना आहार मिळत असल्याने ती हद्दवाढ भाग सोडून बाहेर जाताना दिसत नाहीत. कोणी त्यांना माया दाखवणं हे अंगलट येऊ शकते अशी भिती प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ती उपद्रवी ठरतील. या वानरांमागे लहान मुलांचाही गलका होताना पाहायला मिळतय.उपद्रवी ठरतील..पर्यावरण प्रेमींच्या मते ही वानरं केवळ उन्हाळ्यात त्यांना त्यांच्या परिसरात अन्न, पाणी मिळत नसल्याने पावसाळ्यापर्यंत ते विस्थापित होतात. पावसाळ्यात ते पुन्हा आपल्या प्रदेशात जातात. काहीवेळा काही लोक कंटाळून रात्री त्यांना वाहनातून अज्ञातस्थळी नेऊन सोडतात. ती भटकत येतात. परंतू त्यांना माणसाप्रमाणे खाऊ घालणे, सांभाळणे, जवळीकता साधणे हे धोक्याचे ठरते.ही वानरं आरक्षीत प्राणी आहेत. १९७२ च्या कलमांनुसार त्यांना पकडता येत नाही. लोकांनी त्यांना खायला-प्यायला घालत असल्याने ती गावातून जात नाहीत. त्यांची व्यवस्था करणे चुकीचे आहे. उलट एकाद्याकडून अन्न, पाणी नाही मिळाल्यास त्यांच्याकडून हल्ला होऊ शकतो. नैसर्गिक वातावरणात ती भटकत राहातात. फटाक्यांचा आवाज येतोच घाबरुन ते आवाजाने दूर पळून जातात. सर्वसामान्यांनी खबरदारी घ्यावी.सावंतवनपरीक्षेत्र अधिकारी