युवा सेना तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे हे पुरवठा विभागात पाठपुरावा करताना पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून वंदना पवार व योगेश नावचे क्लार्क 'आज या, उद्या या' अशी उत्तरे देत आहेत. प्रशासनाच्या चुकांमुळे नागरिकांची उपासमार होत आहे. एकीकडे गोरगरीब लोकांना डावलायचे व धनदांडग्यांचे नावे यादीत घुसडायची असे प्रकारदेखील घडले असून याची चौकशी व्हावी या मागणीसाठी १२ जुलैपासून तहसीलसमोर उपोषण करण्यात येईल, असे तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात शंभुराजे फरतडे यांनी म्हटले आहे.
---
२०१३ साली योजनेत पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, यातील काही मृत झाल्याने, तर काही बाहेरगावी गेल्याने अनेक गावांत कोटा शिल्लक असल्याने रेशन दुकानदार यांनी नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत ते मंजूर करण्यासाठी नवीन ईष्टांकची गरज नसून करमाळा पुरवठा विभागास मंजुरीचे आधिकार आहेत. मात्र, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
---