जनावरांचा बाजार बंद असल्याने येत असलेल्या अडचणी व्यापाऱ्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यांच्या प्रयत्नाने बाजार भरण्यास परवानगी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांचा व्यापार होऊ लागला आहे. खरेदीसाठी जिल्ह्याबरोबरच विजापूर, चडचण, कोल्हापूर, सांगली, म्हसवड, पुणे, इंदापूर, बारामती, कळंब, नळदुर्ग येथील व्यापारी येत असून, जनावरांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत.
बाजाराच्या प्रारंभी लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी उपस्थित सर्व व्यापाऱ्यांचे पुष्पहार, श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिन पाटील, राजू गुंड, जयराम बोडके, विठ्ठल थिटे, धनाजी गुंड, शहाजी गुंड, महादेव शेळके, बंटू गुंड, दीपक थिटे, अभिजित काळे, बाबा गुंड, राहुल म्हेत्रे, राजेंद्र खडके, सुग्रीव गुंड, लतीफ पठाण, अमोल जाधव आदी उपस्थित होते.
........
फोटो ओळी
अनगर येथे नव्याने सुरू झालेल्या जनावरांच्या बाजारात शेतकरी व व्यापारी यांच्याशी संवाद साधताना पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील.