शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 2:23 PM

रोजगार हमी योजनेंतर्गत कामे : चार वर्षात लावली ४ लाख ५० हजार ४८५ रोपं...

ठळक मुद्देनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावलीसिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत

सोलापूर : कोरोना काळात नैसर्गिक आणि कृत्रिम ऑक्सिजनची चर्चा घराघरात होतेय़ याचे महत्त्वही प्रत्येकाला कळून आले आहे. सोलापुरात नैसर्गिक ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न झाले आहेत. २०१६ ते २०२० या चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत विविध उपक्रमांतर्गत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात ४ लाख ५०,४८५ रोपं लावली़ त्यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात ३ लाख ९,२४५ रोपं जगली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़) चे इर्शाद शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली आहे़ हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभाग हे दोन्ही विभाग विविध माध्यमातून धडपड करीत आहेत़ याही काळात रोपांच्या लागवडीवर भर दिला आहे.

मागील चार वर्षांत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यात ऑक्सिजन वाढवणारी लिंब, सुबाभूळ, अंजन, खैरसह आवळा, सीताफळ आणि आंबा अशी फळ रोपं लावली आहेत. ही रोपं लावत असताना त्याचे नियोजनही केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात गंगाधर कणबस, आचेगाव, हत्तूर, घोडातांडा, माळकवठे, हत्तरसंग, बोरामणी, सलगर, औज मंद्रुप, भंडारकवठे या गावांमध्ये तर उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी, कौठाळी आणि सिद्धेश्वर वनविहारात रोपं लावली आहेत़ याशिवाय अक्कलकोट तालुक्यात दहिटणे, मैंदर्गी, कल्लप्पावाडी, सलगर, चुंगी, सातनदुधनी, मिरजगी, गळोरगी या गावांमध्ये वनविभागाच्या वतीने विविध रोपं लावण्यात आली आहेत़ 

वनविहारात लावली आंब्याची रोपंनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावली़ या शिवाय सिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत़ 

सोलापुरात वृक्षलागवड वाढवून वनाधित क्षेत्र टिकवण्याचा प्रयत्न आहे़ वनपरिक्षेत्रात अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर रोपं लावली आहेत़ चार वर्षांत ४ लाख ५०, ४८५ रोपं लावली़ ती जगवण्यासाठी वनखात्याचा प्रयत्न झाला़ आता राहिलेल्या रोपांना पाण्याची कमतरता जाणवणार नाही यासाठी नियोजन करतोय़ - इर्शाद शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़), सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणSmart Cityस्मार्ट सिटी