ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ६ - राज्यात १ जुलै या एकाच दिवशी २ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात सहा लाख ३८ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शासनाचे २० विभाग यामध्ये सहभागी झाले होते. सामाजिक वनीकरण १.२० लाख तर वन खात्याकडून ५.७६ लाख झाडे लावली जातील असे नियोजन केले होते. वन खात्याने एकूण पाच लाख ८९ हजार ४३४ झाडे लावल्याची माहिती उपवनसंरक्षक सुभाष बडवे यांनी ‘लोकमत’ला दिली़
कडूलिंब, आवळा, सीताफळ, चिंच, बाभूळ आदी विविध सात प्रकारच्या प्रजातींची झाडे लावली आहेत़ काही झाडे मेल्यास त्याठिकाणी पुन्हा ऑगस्टमध्ये झाडे लावली जातील़ एकूण क्षेत्राच्या ३३ टक्के असले पाहिजे़ सोलापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे १४ लाख ८५ हजार हेक्टर असून वनक्षेत्र हे १.७५ टक्के म्हणजेच अवघे २६ हजार हेक्टर आहे़ वनांचे एकूण १६ प्रकार असून सिध्देश्वर वन विहार एक जिल्ह्यातील सर्वांत मोठे वन आहे.
वनेतर जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वनीकरण केले जाते. महसूल विभागाकडे देखील १.७६ हजार हेक्टर जमीन वन खात्यासाठीची आहे ती वनखात्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बडवे म्हणाले.