मोरवड, मांगी, हिवरवाडी, भोसे परिसरात हिंस्त्र प्राण्याचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या आठवडाभरापासून करमाळा तालुक्यात हिंस्त्र प्राणी हा बिबट्या असल्याची चर्चा आहे. वनविभागाच्या वतीने वेगवान पावले उचलणे अपेक्षित असताना त्याठिकाणी दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचाच परिणाम गुरुवारी सायंकाळी कल्याण दुधे या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतरच प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे.
घटना घडल्यानंतर गुरुवारी रात्रीच मोहोळ, सोलापूर, अमदनगर व पुणे विभागातील वनविभागाचे कर्मचारी करमाळा तालुक्यात दाखल झाले आहेत. तालुक्यात ज्या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे त्या ठिकाणच्या भागात या प्राण्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. तब्बल पाच ते सहा ठिकाणी सापळा रचण्यात येणार आहे. त्यामध्ये जिंती, मोरवड, रोशेवाडी, लिंबेवाडी या भागांचा समावेश आहे.
-----
आमदार संजयमामा शिंदे यांची घटनास्थळी भेट...
फुंदेवाडी (रावगाव) येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्या घटनास्थळी भेट देऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी पाहणी केली. तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत नगरचे मुख्य वनपरिक्षेत्र अधिकारी तेलंग , सोलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाटे , पंचायत समिती सदस्य, ॲड.राहुल सावंत, तानाजी झोळ, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
०४करमाळा-बिबट्या
फुंदेवाडी (रावगाव) येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना सूचना देताना आ.संजयमामा शिंदे.
---