गोरडवाडी येथील वनविभागाच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत विरुद्ध शेतकऱ्यांना विश्वासात घेत बांधबंदिस्ती करून वृक्ष लागवडीच्या दृष्टीने तयारी करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.
गोरडवाडी हद्दीतील गट नं. ६०३ मधील वनजमिनीत शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ड्रीप व मल्चिंग करून वांगी, मिरची, ऊसासह इतर पिके केली होती. यावर्षी रोप लागवड करण्यात येणार आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी आय. ए. एच. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी संतोष आगरकर, एस. एम. लडकत, वन अधिकारी वनरक्षक राजकुमार जाधव यांनी शेतकऱ्यांना बोलावून वन जमिनीचे, झाडाचे, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देऊन मशीनच्या सहाय्याने अतिक्रमण काढून बांधबंदिस्ती करून घेण्यात आली.